Press "Enter" to skip to content

नीरव मोदीकडून कॉंग्रेसने ४५६ कोटी रुपये घेऊन फरार होण्यास मदत केली? वाचा सत्य!

सोशल मीडियात नीरव मोदीची (Nirav Modi) सही असलेला ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’च्या नावे लिहिलेला ९८ कोटी रुपयांच्या चेकचा फोटो व्हायरल होतोय. दावा केला जातोय की कॉंग्रेसने नीरव मोदीकडून तब्बल ४५६ कोटी कमिशन घेऊन फरार होण्यास मदत केली.

Advertisement

राजेंद्र अग्रवाल यांच्या फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल होतोय. यात ऍक्सिस बँकेचा चेक दिसत आहे. त्यावर नीरव मोदी (Nirav Modi) असे लिहिलेली स्वाक्षरी दिसतेय. ‘इंडियन नॅशनल कॉंग्रेस’च्या नावे ९८ करोड रुपये दिल्याचे दिसत आहे. या चेकच्या फोटोसह,

‘लंदन में गिरफ्तारी के बाद नीरव मोदी ने किया स्विकार- राहुल गांधी और प्रियांका वाड्रा ने अपना पोल खुलने के डर से विदेश भगा दिया था. ब्रेकिंग: काँग्रेसीयोने ४५६ करोड रुपये कमिशन खा कर मुझे भगाया- बयान नीरव मोदी #इंग्लंड कोर्ट में’ असा मजकूर देखील आहे.

Neerav Modi Cheque to Congress viral screenshot
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक डॉ. भारत पाटोळे आणि सुमित अनगळ यांनी सदर स्क्रिनशॉट व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल पोस्टमधील चेकचा फोटो व्यवस्थित पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की,

१. नीरव मोदी असे लिहिलेल्या स्वाक्षरीखाली दुसऱ्याच कुणाची स्वाक्षरी फोटो एडिटिंगच्या सहाय्याने खोडल्याचे दिसते आहे.

२. चेकवरील रक्कम शब्दांत लिहिताना ‘Ninety’ लिहिण्याऐवजी ‘Ninenty’ असे लिहिले आहे.

३. नीरव मोदी मुंबईला स्थायिक होता परंतु चेकवर ऍक्सिस बँकेची शाखा ‘नॉर्थ लखीमपुर ब्रांच, आसाम’ असे लिहिले आहे.

Nirav Modi Gave Rs 98 Crore to Congress? No, This Cheque Is Fake
Source: The Quint

हा चेक २५ सप्टेंबर २०११ रोजीचा असल्याचे दिसते आहे. जर चेक थेट पक्षाच्या नावाने दिला आहे तर तो पक्षाच्या खात्यातही जमा झाला असणारच. हे पडताळण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगापुढे कॉंग्रेस पक्षाने २०११-१२ या वर्षात सादर केलेला पक्षाच्या देणगीदारांचा अहवाल तपासला.

या अहवालानुसार ३४२ देणगीदारांनी २०,००० रुपयांपेक्षा देणगी दिली असल्याचे सांगितले आहे. या ३४२ पैकी २ कोटी रुपयांहून जास्त एकही रक्कम नाही. तसेच ‘मायनेता‘ या वेबसाईटनुसार कॉंग्रेस पक्षाने २०११-१२ या आर्थिक वर्षात आलेली देणगी ९.५९ कोटी असल्याचे जाहीर केले आहे.

वस्तुस्थिती:

जर संपूर्ण आर्थिक वर्षात केवळ ९.५९ कोटी रुपये देणगी आली असेल तर या ९८ कोटी रुपयांच्या चेकचे आणि पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे ४५६ कोटी रुपयांचे नेमके काय झाले याचे तार्किक उत्तर सापडत नाही. याचाच अर्थ नीरव मोदीने ‘कॉंग्रेस’ पक्षाच्या नावे असा कधी चेक दिलाच नव्हता. हा चेक ‘फेक’ आहे. त्यामुळे बनावट चेकच्या सहाय्याने केलेला दावा देखील विश्वासपात्र नाही.

हेही वाचा: प्रियंका गांधींच्या लग्न समारंभातील विधी मुस्लिम मौलवींनी पार पाडले होते?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा