Press "Enter" to skip to content

अरविंद केजरीवाल यांनी लाईव्ह टीव्हीवरील मुलाखतीत दिली लाच घेतल्याची कबुली? वाचा सत्य!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ‘इंडिया टीव्ही’ या हिंदी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होतेय. ही क्लिप शेअर करताना दावा केला जातोय की खुद्ध केजरीवाल यांनीच लाईव्ह टीव्हीवरील चर्चेत आपण तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) लाच घेत असल्याची कबुली दिली आहे.

Advertisement

दिल्ली भाजपचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही क्लिप शेअर केलीय.

पडताळणी:

इंडिया टीव्हीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर अरविंद केजरीवाल यांची संपूर्ण मुलाखत उपलब्ध आहे. या मुलाखतीत केजरीवाल म्हणतात की,

“पहले पैसा मुख्यमंत्री तक पहुंचता था, अब हमारे भगवंत मान भी पैसे नहीं लेते, मैं भी पैसा नहीं लेता, मंत्री भी पैसे नहीं लेते, एमएलए भी पैसे नहीं लेता। वहां पर तहसीलदारों की मिटिंग हुई है अभी पंजाब में, उन्होंने कहा कि भाई अब नीचे से भी पैसा नहीं लेना और ऊपर भी नहीं पहुंचाना। ऊपर पहुँचाने की जरुरत नहीं अब कोई नहीं मांग रहा।”

नवीन कुमार जिंदल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये केजरीवाल यांच्या ‘अब हमारे भगवंत मान भी पैसे नहीं लेते, मैं भी पैसा नहीं लेता, मंत्री भी पैसे नहीं लेते, एमएलए भी पैसे नहीं लेता। वहां पर तहसीलदारों की मिटिंग हुई है अभी पंजाब में, उन्होंने कहा कि भाई अब नीचे से भी पैसा नहीं लेना और ऊपर भी नहीं पहुंचाना।’ या मूळ वक्तव्यातील पैसे या शब्दानंतरचा नहीं हा शब्द एडिटिंगच्या आधारे काढून टाकण्यात आला असून केजरीवाल यांनी आपण स्वतः, भगवंत मान आणि आपचे मंत्री तसेच आमदार सर्वच पैसे घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

केजरीवाल यांची संपूर्ण मुलाखत आपण ‘इंडिया टीव्ही’च्या यूट्युब चॅनेलवर बघू शकता. या मुलाखतीतील भ्रष्टाचारासंदर्भातील प्रश्नाला केजरीवाल यांनी दिलेलं मूळ उत्तर देखील आपण व्हिडिओच्या 6.54 सेकंदापासून ऐकू शकता.

दरम्यान, आता या प्रकरणी पंजाब पोलिसांनी भाजप प्रवक्ते नवीन कुमार जिंदाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अरविंद केजरीवाल यांनी लाईव्ह मुलाखतीत आपण लाच घेत असल्याची कबुली दिल्याचे दावे चुकीचे आहेत. केजरीवाल यांच्या मूळ वक्तव्याशी छेडछाड करण्यात आली असून केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराची कबुली दिली असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा- भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांच्या दारू पार्टीचा व्हायरल फोटो फेक! वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा