Press "Enter" to skip to content

‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर भारताचा विकास थांबेल’, अमेरिकन उद्योगपतीने केलेली भविष्यवाणी?

सोशल मीडियावर एका वृत्तपत्राचे कटिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमेरिकन उद्योगपतीने भविष्यवाणी केली होती की ‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर भारताच्या विकासाचे चाक थांबेल’. ही भविष्यवाणी आता खरी ठरली आहे, असा दावा या कटिंगमध्ये केला जातोय.

Advertisement

झैद आलम आलम या फेसबुक युजरने “मोदी दोबारा PM बना तो थम जाएगा भारत के विकास का पहिया” अशी हेडलाईन असणारे हे कटिंग पोस्ट केले आहे. बातमी लिहीपर्यंत जवळपास ९३१ युजर्सकडून ही पोस्ट शेअर केली गेली आहे.

Paper cutting claiming prediction of american bussinessman about indian PM
Source: Facebook

ट्विटरवर देखील अशाच प्रकारचा दावा केला जातोय.

पडताळणी:

  • सर्वात महत्वाची गोष्ट अशी की व्हायरल कटिंगच्या हेडलाईनमध्ये ज्या प्रकारची भाषा वापरण्यात आलेली आहे, तशी एकेरी भाषा कुठल्याही माध्यमांकडून वापरली जात नाही. त्यामुळे ही कटिंग प्रथमदर्शनीच संशयास्पद वाटते.
  • दुसरी महत्वाची गोष्ट अशी की बातमीच्या सुरुवातीलाच “अमेरिका के शीर्ष उद्योगपति जॉन चैंबर्स ने कहा है कि अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को अगले संसदीय चुनाव में देश का नेतृत्व करने का मौका नहीं मिला तो भारत का प्रभावशाली और समग्र विकास खतरे में पड़ सकता है।” असे वाक्य बघायला मिळते. हे विधान हेडलाईनच्या अगदी उलटे आहे. यावरूनच व्हायरल कटिंगमध्ये बातमीच्या हेडलाईनशी छेडछाड करण्यात आली असल्याचे लक्षात येते.
  • बातमीत जॉन चेंबर्स (John Chambers) यांच्या नावाचा उल्लेख बघायला मिळतोय. त्यामुळे आम्ही गुगल किवर्डसच्या मदतीने जॉन चेंबर्स यांनी मोदींविषयी नेमकं काय म्हंटलं होतं, ते शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला दैनिक जागरणच्या वेबसाईटवर १ जुलै २०१८ रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. या बातमीचे हेडलाईन आहे, “मोदी दोबारा पीएम नहीं बने तो थम जाएगा भारत के विकास का पहिया: जॉन चैंबर्स”
  • या बातमीनुसार सिस्को सिस्टम्सचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चेंबर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची स्तुती केली होती. भारताला सर्वसमावेशक विकासाची संधी असून हे ध्येय्य साध्य करण्यासाठी किमान दशकभर निरंतर प्रयत्न करावे लागतील. पंतप्रधान मोदींमध्ये हे करण्याची क्षमता आहे. ते देशाला योग्य दिशेने घेऊन जात आहेत, असे जॉन चेंबर्स यांनी म्हंटले होते.
  • सध्या व्हायरल होत असलेली कटिंग ज्या मूळ बातमीशी छेडछाड करून बनवण्यात आली आहे, ती बातमी देखील आम्हाला ‘बीजेपी लाईव्ह’ या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये मिळाली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. अमेरिकन उद्योगपती जॉन चेंबर्स यांनी ‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर भारताचा विकास थांबेल’ अशी भविष्यवाणी केली नव्हती.

चेंबर्स यांनी मोदींची स्तुतीच केली होती. साधारणतः तीन वर्षांपूर्वीच्या या वक्तव्याच्या बातमीच्या हेडलाईनशी छेडछाड करून ती चुकीच्या दाव्यांसह शेअर केली जातेय.

हे ही वाचा-  न्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करणारा लेख लिहिलाय?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा