Press "Enter" to skip to content

अखिलेश यादव यांनी भाषणात केवळ ‘जीनांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा’ दावा केला?

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये अखिलेश यादव मोहोम्मद अली जिन्ना (Muhammad Ali Jinnah) यांच्याविषयी बोलताना दिसताहेत.

Advertisement

व्हिडीओ शेअर करताना अमित मालवीय म्हणताहेत की अखिलेश यादव जीनांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा दावा केलाय. काही मतांसाठी अखिलेश यादव मुस्लिमांच्या लांगूलचालनाची हद्द पार करताहेत.

अर्काइव्ह

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील व्हिडीओ न शेअर करता अशाच प्रकारचा दावा केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मोहोम्मद अली जिन्ना (Muhammad Ali Jinnah) यांच्याविषयी नेमकं काय म्हंटलंय हे शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ‘बीबीसी हिंदी’चा एक रिपोर्ट बघायला मिळाला. या रिपोर्टमध्ये अखिलेश यांच्या उत्तर प्रदेशातील हरदोई येथील सभेतील भाषणातील मूळ वक्तव्य बघायला मिळालं.

मूळ व्हिडिओमध्ये अखिलेश यादव हे केवळ जीना यांच्याविषयी नव्हे, तर सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी आणि जवाहलाल नेहरू या सर्वांविषयी बोलत असल्याचं बघायला मिळतंय. सरदार पटेल, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि जीना या सर्वांनी एकाच ठिकाणी शिक्षण घेतलं, बॅरिस्टरची पदवी मिळवली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, असं ते म्हणताहेत.   

ट्विटरवर देखील अमरेंद्र पांडेय यांच्याकडून अखिलेश यांच्या मूळ भाषणातील २ मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. यामध्ये देखील सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जात असल्याचं स्पष्ट होतंय. मूळ भाषणातील सरदार पटेल, महात्मा गांधी आणि जवाहराल नेहरू यांच्या उल्लेखाचा भाग वगळून केवळ जीना यांच्याविषयीचा भाग शेअर केला जातोय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा काटछाट केलेला व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह व्हायरल होतोय. अखिलेश यादव यांनी केवळ मोहोम्मद अली जीना यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, असं म्हण्टलेलं नाही तर सरदार पटेल, महात्मा गांधी आणि जवाहराल नेहरू यांच्यासह जीना यांच्या योगदानाचा अखिलेश यांनी उल्लेख केलाय.

हेही वाचा- त्रिपुरा दंगलीत पोलिसांनी मुस्लिमांविरोधात हिंदुना मदत केल्याचे ‘बीबीसी’ व्हिडीओसोबतचे दावे चुकीचे!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा