Press "Enter" to skip to content

अभिनेता सोनू सूदने काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय? वाचा सत्य!

सोशल मीडियावर सध्या अभिनेता सोनू सूदचे (Sonu Sood) वेगवेगळे फोटोज व्हायरल होताहेत. काही फोटोजमध्ये सोनू सूद काँग्रेस नेत्यांसोबत बघायला मिळातोय. दावा केला जातोय की सोनू सूदने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

युथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव शेष नारायण ओझा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सोनू सूद यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचा दावा केलाय.

अर्काइव्ह

पश्चिम बंगाल प्रदेश महिला काँग्रेसच्या अधिकृत अकाऊंटवरून देखील अशाच प्रकारचा दावा करण्यात आलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

सोनू सूदच्या काँग्रेस प्रवेशाविषयीची कुठलीही बातमी आमच्या वाचण्यात आलेली नसल्याने त्यासंदर्भात शोध घेणे सुरु केले असता सोनू सूदची बहीण मालविका सूद (Malvika Sood) यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या अनेक बातम्या बघायला मिळाल्या.

लोकसत्ताच्या बातमीनुसार सोनूची बहीण मालविका सूद पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) पंजाब काँग्रेस कमिटीचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये सामील झाल्या. यावेळी अभिनेता सोनू सूद देखील उपस्थित होता. बातमीमध्ये कुठेही सोनू सूदने देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचा उल्लेख बघायला मिळत नाही.

काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी देखील ट्विटरवर मालविका सूद यांच्या काँग्रेस प्रवेशाची माहिती दिली होती. यावेळी चन्नी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिनेता सोनू सूद देखील बघायला मिळतोय.

दरम्यान, सोनू सूदने देखील आपल्या बहिणीच्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभाची माहिती देताना तिला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचवेळी एक अभिनेता आणि मानवतावादी म्हणून कुठल्याही राजकीय संलग्नतेशिवाय आपले कार्य सुरूच ठेवणार असल्याचे देखील सांगितले होते.

त्यानंतर सोनूने सूदने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेली मुलाखत देखील आम्हाला वाचायला मिळाली. या मुलाखतीत त्याने आपण बहिण मालविकासाठी निवडणूक प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मी नेहमीच राजकारण किंवा कोणत्याही राजकीय संलग्नतेपासून दूर राहीन आणि सध्या करत असलेले काम पुढेही करत राहीन. मी निवडणुकीत बहिणीसाठी प्रचार करणार नाही, कारण तिने मेहनत करावी अशी माझी इच्छा आहे, असे सोनू सूदने सांगितले होते.

Source: Times of India

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की अभिनेता सोनू सूदने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. आपण स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले असून बहिणीचा प्रचार देखील करणार नसल्याचे सोनू सूदने स्वतःच स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- राजीव गांधींच्या रक्षणासाठी SPG ने चुकून एका भिकाऱ्याला गोळ्या घातल्या?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा