Press "Enter" to skip to content

मिशी नसलेली व्यक्ती स्वतःला शीख भासवत शेतकरी मोर्च्यात सामील?

केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या मोर्चात सरकारविरोधी, भाजपविरोधी, भारतविरोधी लोक आहेत हे सातत्याने दाखवण्यासाठी भाजपचा आयटी सेल कार्यरत असल्याच्या बातम्या आपण ‘चेकपोस्ट मराठी’वर वाचल्या असतीलच. सध्या बिना मिशीचा व्यक्ती (मुस्लीम व्यक्ती) शीख असल्याचे दाखवत शेतकरी मोर्च्यात सामील झाल्याचं सांगण्यासाठी एक फोटो व्हायरल करण्यात येतोय.

Advertisement

इन सरदार जी की मूछें कहाँ गईं😢

Posted by Adv Hemant Jain on Tuesday, 1 December 2020

‘इन सरदार जी की मूछें कहाँ गईं’ या कॅप्शनच्या कीवर्ड्सचा आधार घेऊन फेसबुक सर्च करून पाहिल्यास हजारो लोकांनी हे दावे शेअर केल्याचे निदर्शनास येईल.

facebook virals claiming seekh man as a muslim person
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करताना हर्षित गुप्ता नावाच्या व्यक्तीने केलेल्या अशाच एका पोस्टखाली बिलाल मन्सुरी या फेसबुक युजरने ‘हिंदुस्तान लाईव्ह‘ची एक लिंक शेअर केल्याचे आढळले. या लिंकवर क्लिक केल्यानंतर सत्य समोर आले.

फेसबुकवर २९ नोव्हेंबर रोजी स्ट्रीम झालेल्या व्हिडीओमध्ये ७.२९ मिनिटाला व्हायरल फोटोतील व्यक्ती हाताची घडी घालून उभी असल्याचे दिसते. यात त्या व्यक्तीच्या मिशा स्पष्टपणे दिसून येत आहेत. याचाच अर्थ शेतकरी मोर्चाला बदनाम करण्यासाठी जे खोटे दावे पेरले जात आहेत त्यात या दाव्याची भर घालण्यासाठी फोटो एडीट करत शीख व्यक्तीच्या मिशा काढून टाकण्यात आल्या आहेत.

व्हायरल पोस्ट्समधील व्यक्तीची इमेज आणि हिंदुस्तान लाइव्ह व्हिडीओतील व्यक्तीचा स्क्रीनशॉटची तुलना करून पाहिल्यास सत्य लक्षात येईल.

sheekh man pic viral as muslim person comparison

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल पोस्ट्समधील दावे फेक निघाले कारण त्या दाव्यांसोबत शेअर होत असलेला फोटो एडीट केलेला आहे.वस्तुतः मूळ व्हिडीओत त्या व्यक्तीस मिशा आहेत.

हेही वाचा: आंदोलनात दुखापत झालेले वृद्ध शेतकरी निवृत्त सैन्य अधिकारी असल्याचे व्हायरल दावे फेक!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा