Press "Enter" to skip to content

इंडोनेशियात समुद्राच्या आत सापडले ५००० वर्षांपूर्वीचे विष्णू मंदिर? वाचा सत्य!

सोशल मीडियात पाण्यातील मूर्तीचा फोटो व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की इंडोनेशियातील बाली येथे भगवान विष्णूच्या ५००० वर्षे जुन्या मुर्त्या सापडल्या आहेत. इंडोनेशियातील भगवान विष्णूचे हे मंदिर (Vishnu temple Indonesia) म्हणजे सनातन हिंदू संस्कृतीचे दक्षिण आशियातील अस्तित्व सिद्ध करणारे आहे, असाही दावा केला जातोय.

Advertisement

ट्विटरवर हा फोटो पोस्ट करताना एका युजरने लिहिलंय, “5000 वर्ष पुरानी भगवान श्री विष्णुजी इंडोनेशिया के बाली सागर में पाए गए। महाभारत लगभग 5500 बीसी की है, तो भारत का कौन सा राज्य इंडोनेशिया था और क्या उसने महाभारत में भाग लिया था? सनातन दक्षिण एशिया में अखण्ड भारत की सीमाओं तक सदैव विद्यमान था”

अर्काइव्ह

‘दैनिक जागरण’च्या वेबसाईटवर देखील यासंदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून मंदिरातील विष्णूची मूर्ती जवळपास ५००० वर्षांपूर्वीची असल्याचं जागरणच्या बातमीत सांगण्यात आलेलं आहे.

Dainik Jagran news about indonecia underwater vishnu temple
Source: Dainik Jagran

शिवाय अशाच प्रकारचे दावे करणारे अनेक व्हिडीओज यूट्यूबवर देखील उपलब्ध आहेत.

पडताळणी:

इंडोनेशियामधील भगवान विष्णूच्या ५००० वर्षे जुन्या मंदिरातील (Vishnu temple Indonesia) म्हणून व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता फोटो स्टॉक वेबसाईट शटरस्टॉकवर आम्हाला हा फोटो बघायला मिळाला.

शटरस्टॉकवरच्या माहितीनुसार हा फोटो इंडोनेशियातील बाली येथील तुलंबेन बीच जवळच्या बुद्ध मंदिरातील आहे. हे बुद्ध मंदिर जमिनीखाली आहे.

स्क्यूबाडायविंग वेबसाईटवरील माहितीनुसार या मूर्तीचे नाव ‘स्लिपींग बुद्धा’ असून २०१२ सालपासून याठिकाणी ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. बुद्धाची आई माता तारा यांची मूर्ती देखील येथे आहे. स्क्यूबा डायविंग करणाऱ्या पर्यटकांमध्ये हे स्थळ लोकप्रिय व्हायला लागलं आहे.

‘मावीबा’च्या वेबसाईटवर पाण्यातील हिंदू मंदिराची माहिती वाचायला मिळते. मात्र या ठिकाणी देखील हे मंदिर ५००० वर्षांपूर्वीचे असल्याचे दावे म्हणजे केवळ अफवा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दाव्यांमध्ये कसल्याही प्रकारचे तथ्य नाही. ना या दाव्यांना कुठला आधार आहे.

व्हायरल फोटो ५००० वर्षांपूर्वीच्या मंदिरातील भगवान विष्णूचा नाही तर इंडोनेशियातील बाली येथील जमिनीखालील बुद्ध मंदिरातील आहे. ही मूर्ती त्याठिकणी २०१२ पासून आहे.

हेही वाचा- ‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा