Press "Enter" to skip to content

अयोद्धेत ५००० वर्षे जुनं ‘राम मंदिर’ सापडलंय का?

सोशल मीडियावर सध्या तीन घुमट असलेल्या मंदिराचा फोटो व्हायरल होतोय. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वेळी सापडलेलं हे मंदिर सुमारे ५००० वर्षे जुनं (5000 years old ram temple) असल्याचं सांगितलं जातंय. येत्या काही दिवसांमध्ये अयोध्येत अशी अनेक छुपी मंदिरे सापडतील, असा दावा देखील सूत्रांच्या हवाल्याने केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

सर्वप्रथम तर आम्ही अयोध्येत रस्ते रुंदीकरणाच्या दरम्यान ५००० वर्षे जुनं राम मंदिर सापडल्याविषयीच्या (5000 years old ram temple) बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला कुठल्याही राष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवरच्या माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या सापडल्या नाहीत. 

कुठल्याही बातम्या न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर राम मंदिराच्या नावाने व्हायरल होत असलेला हा फोटो नेमका कुठला आणि त्याचा खरंच अयोध्येशी काही संबंध आहे का,हे शोधण्यासाठी आम्ही फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला.

आम्हाला १३ जून २०२० रोजी ‘पंडित रुल्स’ या फेसबुक पेजवरून हा फोटो अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले. काशी विश्वनाथाच्या जीर्णोद्धारादरम्यानचा हा फोटो असल्याचे तसेच या दरम्यान परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली असल्याचे, देखील या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

बहुत सुन्दर…काशी का नवसृजन हो रहा है, अधिकांश अवैध कब्जे हटवा दिये।जय श्री रामहर हर महादेव

Posted by पंडित RULES on Saturday, 13 June 2020

या माहितीच्या आधारे आम्ही गुगल सर्चच्या मदतीने अधिक तपशील मिळवायचा प्रयत्न केला. आम्हाला ‘अमर उजाला’ वेबसाइटवर ५ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित बातमीमध्ये हा फोटो सापडला. बातमीनुसार फोटो काशी विश्वनाथ कॉरिडॉरचाच आहे.

बातमीनुसार काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीचे कार्य १५ जानेवारीपासून सुरु होणार होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जाणारा हा प्रोजेक्ट पुढील १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. गुजरातस्थित पीएसपी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीवर कॉरिडॉरच्या निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आम्हाला ‘इंडिया टुडे’चा एक रिपोर्ट देखील मिळाला. या रिपोर्टनुसार व्हायरल फोटो वाराणसी अर्थात काशीतील चंद्रगुप्त महादेव मंदिराची असून काशी विश्वनाथ कॉरिडोर प्रकल्पांतर्गत त्या मंदिराचा जिर्णोद्दार केला जातोय.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर ५००० वर्षे जुन्या राम मंदिराचे म्हणून व्हायरल फोटोज हे काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत काशीमधील चंद्रगुप्त महादेव मंदिराचे आहेत. व्हायरल फोटोजचा अयोध्येशी अथवा राम मंदिराशी काहीही संबंध नाही.

हे ही वाचा- मुस्लीम युवक हिंदू वेद-उपनिषदांमध्ये चुकीचे बदल करून प्रकाशित करताहेत?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा