Press "Enter" to skip to content

हिंदू मुलीने धर्मांतरास नकार दिल्याने तिची भरदिवसा गळा चिरून हत्या केल्याचे व्हायरल दावे फेक!

गुजरातच्या सुरतमध्ये हिंदू मुलीने मुस्लीम बनण्यास नकार दिल्याने कट्टरपंथी युवकाने भर दिवसा तिची गळा चिरून हत्या केल्याचे दावे सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतायेत. यास आधार म्हणून तो हादरवून टाकणारा व्हिडीओही शेअर केला जातोय. (gujrat youth slitted throat)

Advertisement

‘सूरत में हिंदू लड़की ने मुसलमान बनने से मना करा दो कट्टरपंथी मुसलमान ने लड़की को मार डाला अरे मेरे हिंदू भाइयों कब तक अपनी लड़कियों को ऐसे ही कटवाते रहोगे ।
अब तो वक्त आ गया है जागो मेरे हिंदूओं
कमजोर दिल वाले कृपया विडिओ ना देखे’
अशा कॅप्शनसह २४ सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला जातोय.

फेसबुक, ट्विटरप्रमाणेच व्हॉट्सऍपवर मराठी मजकुरासह हे दावे व्हायरल होत असल्याचे चेकपोस्ट मराठीचे वाचक प्रकाशभाऊ जगताप आणि दिनेश सूर्यवंशी यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ आणि त्यासोबतच्या दाव्यास अनुसरून काही कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता आम्हाला ‘द इंडियन एक्स्प्रेस’ची बातमी सापडली.

१६ फेब्रुवारी २०२२ रोजी पब्लिश झालेल्या या बातमीनुसार प्रेमसंबंधांस नकार दिल्याच्या रागात २० वर्षीय युवकाने २१ वर्षीय मुलीची तिच्याच घरच्यांसमोर गळा चिरून हत्या केली. ही घटना सुरतच्या पासोदरा भागात कामरेज पोलिस स्टेशनच्या कक्षेत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचे नाव ग्रीष्मा वेकारीया असून मुलाचे नाव फेनील गोयानी असे आहे.

कामरेज पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही एकाच धर्माचे-जातीचे होते. यात कुठेही धार्मिक कट्टरतेच संबंध नाही.

Surat boy slitted girls throat indian express news
Source: Facebook

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार मुस्लीम कट्टरपंथीय मुलाने धर्म बदलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून हिंदू मुलीची हत्या केल्याचे दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. व्हायरल व्हिडीओ गुजरातच्या सुरतमधीलआहे हे खरे परंतु सदर घटनेमध्ये धार्मिक कट्टरतेच काहीएक संबंध नाही, दोघेही एकाच धर्माचे आहेत.

हेही वाचा: हिजाब विवाद: ‘बुरखा गर्ल’ कन्हैय्या कुमारच्या कथित ‘टुकडे टुकडे गँग’ची सदस्य असल्याचे व्हायरल दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा