Press "Enter" to skip to content

सरकारने कोविड फंडच्या माध्यमातून 7500 रुपये मंजूर केलेले नाहीत, व्हायरल मेसेज फेक!

व्हाट्सअपवर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मेसेजमध्ये दावा केला जातोय की सरकारने 7500 रुपयांच्या (government lockdown funds 7500)  निधीस मंजुरी दिली असून वितरण देखील सुरु केले आहे. व्हायरल मेसेजसोबत ‘गव्हर्नमेंट लॉकडाऊन फंड’ नावाच्या पोर्टलची लिंक आहे.

Advertisement

आमच्या अधिकृत नंबरवर या मेसेजच्या खरेपणाची पडताळणी करण्याची विनंती करण्यात आली.

whatsapp viral to claim pm unemployed fund 7500 checkpost marathi
Source: Whatsapp

हाच मेसेज ट्विटरवर देखील शेअर करण्यात आलाय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

. डोमेन नेम

बहुतांश सारकारी वेबसाईटचे डोमेन नेम .gov असे असतात. परंतु या मेसेजमधील वेबसाईट .com डोमेनखाली रजिस्टर आहे. ही बाब संशय घेण्यास पुरेशी आहे.

. फंड पॅकेजेसची संख्या कधीच बदलत नाही

वेबसाईटवर गेल्यानंतर ‘फक्त १९३६ मोफत लॉकडाऊन पॅकेजेस शिल्लक’ असल्याचा मेसेज दिसायला लागतो. हा मेसेज कधीच बदलत नाही.

तुम्ही काही तासांच्या किंवा दिवसाच्या अंतराने जरी वेबसाईटवर पुन्हा गेलात, तरी ह्या आकड्यात अजिबात बदल होत नाही. खरंच असे काही पॅकेजेस असतील तर वितरणानंतर त्यांची संख्या कमी होणे अपेक्षित आहे, पण असे होताना दिसत नाही.

screenshot of fake pm fund website checkpost marathi

. संशयास्पद सर्व्हे

वेबसाईटवर युझरकडून एक सर्व्हे भरून घेतला जातो, त्यातल्या प्रश्नांची उत्तरे काहीही दिली तरी पुढचा प्रश्न ठरलेलाच असतो आणि त्यातही काहीही बदल होत नाही. सर्व्हेच्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला फेसबुक कॉमेंट बॉक्स दिसतो. ज्यात काही युजर्सने आपल्याला 7500 रुपयांचे (government lockdown funds 7500) गिफ्ट मिळाल्याचा दावा केलेला आहे.

या कॉमेंट्स देखील कधीच बदलत नाहीत. वेबसाईटला कधीही भेट दिली असता, त्या कॉमेंट्स ‘Just Now’ पोस्ट केलेल्या दिसतात. शिवाय पोस्टवरील लाईक आणि कॉमेंट्सचा आकडा देखील कायमस्वरूपीसाठी २,०४,२०८ आणि १,७३,३३० एवढाच आहे. त्यात देखील कधीच कसलाच बदल होत नाही.

screen shot of pm fund website checkpost marathi

. बँक डिटेल्सची मागणी

screenshot of fake PM fund website checkpost marathi

सर्व्हे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तीच लिंक 7 व्हाट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करायला सांगण्यात येतं आणि एकदा का तुम्ही ती लिंक फॉरवर्ड केली की मग तुमच्याकडून तुमच्या बँकेचं नाव, तुमचा बँक अकाउंट नंबर यांसारखी माहिती मागवली जाते. खऱ्या धोक्याची सुरुवात इथेच होते. तुमच्याकडून तुमची खासगी माहिती गोळा केली जाते आणि त्यानंतर कदाचित तुम्हाला आर्थिक दगाफटका देखील होऊ शकतो.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की ‘गव्हर्नमेंट लॉकडाऊन फंड’च्या नावाने व्हायरल मेसेज फेक आहे. सरकारकडून अशा कुठल्याही फंडची घोषणा करण्यात आलेली नाही.

अनेक पुराव्यांच्या आधारे ‘गव्हर्नमेंट लॉकडाऊन फंड’च्या नावे व्हायरल होत असलेली लिंक बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. बँकिंग डिटेल्स सारखी तुमची खासगी माहिती चोरण्याच्या उद्देशाने ही लिंक व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे ‘गव्हर्नमेंट लॉकडाऊन फंड’च्या फेक मेसेजला आम्ही ‘चेकपोस्ट मराठी’वरच अडवत आहोत.

तुमच्याकडे देखील अशी कुठलीही बातमी किंवा दावा पोचला असेल, ज्याच्या सत्यते विषयी तुम्हाला शंका आहे, तर आमच्या ‘9172011480’ या अधिकृत क्रमांकावर नक्की पाठवा. आम्ही तुम्हाला त्याची सत्यता कळवू. 

हे ही वाचा- ‘ठणठणीत माणसाला मास्कची गरज नाही’ सांगणाऱ्या सरकारी जाहिरातीद्वारे जनतेची दिशाभूल!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा