Press "Enter" to skip to content

आदित्य ठाकरेंसोबतच्या फोटोत सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती नाही !

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण सुरु आहे. प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी जोर धरत असताना महाराष्ट्र सरकार आणि सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा प्रश्नच नाही, हे ठामपणे सांगितलेलं आहे.

Advertisement

सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियांनी या प्रकरणी बिहारमध्ये एफआयआर दाखल केल्यानंतर ‘मुंबई पोलीस’ तपासात बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप देखील बिहार सरकारकडून केला जात आहे.

दरम्यान सोशल मीडियात मात्र ह्या सगळ्या प्रकरणाला वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सध्या सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल करण्यात येतोय.

फोटोत महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत एक तरुणी कारमध्ये बसलेले दिसताहेत. दावा करण्यात येतोय की आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसणारी ही तरुणी सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (aditya thackeray and rhea chakraborty) आहे.

उद्धव ठाकरेंचा मुलगाच सुशांतच्या गर्लफ्रेंड बरोबर फिरत असेल तर कुठून होणार सुशांतच्या  हत्येची सीबीआय चौकशी? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

टीव्ही पत्रकार अर्नब गोस्वामी यांच्या पॅरोडी अकाऊंटवरून करण्यात आलेलं हे ट्वीट बातमी लिहीपर्यंत ४५०० वेळा रिट्वीट करण्यात आलंय 

अर्काइव्ह पोस्ट

याच दाव्यासह उमानंदन मिश्रा या ट्वीटर हँडलवरून करण्यात आलेलं ट्वीट बातमी लिहीपर्यंत ३९०० वेळा रिट्वीट झालंय. 

अर्काइव्ह पोस्ट

हाच कॉपी पेस्ट दावा आणि तोच फोटो वापरून करण्यात आलेले ट्वीटस आपण येथे बघू शकता. फेसबुकवर देखील हाच फोटो ह्याच दाव्यांसह शेअर केला जातोय.

पडताळणी :

खरं तर या दाव्यांची वेगळी पडताळणी करायची काहीच आवश्यकता नाही, कारण फोटोत आदित्य ठाकरे यांच्यासह दिसणारी तरुणी ही सुशांत राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (aditya thackeray and rhea chakraborty) नसून प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी आहे, हे अगदी सहज ओळखता येऊ शकतं.

हा फोटो नेमका कुठल्या औचित्यावर घेण्यात आलाय  हे शोधण्यासाठी मात्र आम्ही ‘गुगल रिव्हर्स सर्च’च्या मदतीने पडताळून बघितला. आम्हाला ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवर १२ मार्च २०१९ रोजीचं फोटो फिचर सापडलं.

Credit : TOI

दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांनी सोबत लंच घेतला त्यावेळचे वेगवेगळे फोटोज या फिचरमध्ये आहेत. सध्या सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येत असलेला फोटो देखील त्यापैकीच एक आहे.

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की आदित्य ठाकरे यांचा साधारणतः वर्षभरापेक्षा पूर्वीचा फोटो सोशल मिडीयावर फेक दाव्यांसह व्हायरल करण्यात येत आहे.

फोटोत आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसणारी तरुणी सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती नसून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आहे.

व्हायरल करण्यात येत असलेल्या फोटोचा आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या सीबीआय तपासाचा दूर दूरपर्यंत काहीही संबंध नाही. 

हे ही वाचा- ‘ठाकरे’ सरकारला तानाशाही म्हणत फिरतेय समीत ठक्करच्या अटकेची फेक पोस्ट!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा