Press "Enter" to skip to content

राफेलसाठी फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी भारताचं अभिनंदन केलंय ?

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत राफेल फायटर जेटचे दोन दिवसांपूर्वी हरयाणामधील अंबाला एअर बेसवर लँडिंग झाले. त्यानंतर राफेलच्या निमित्ताने फ्रांसच्या राष्ट्रपतींनी भारताचं अभिनंदन केल्याचं आणि भारताला शुभेच्छा दिल्याचा दावा करणारं ट्वीट (french president twitter) व्हायरल झालंय.  

Advertisement

फ्रान्सचे राष्ट्रपती इमान्युल मॅक्रो यांच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरून करण्यात आलेलं हे ट्वीट जवळपास ७३०० युजर्सनी रिट्वीट केलंय.

२७ तारखेला करण्यात आलेल्या या ट्वीटमध्ये म्हंटलंय, ‘भारताला शुभेच्छा. राफेल रस्यातच आहे”

त्यानंतर २९ तारखेला म्हणजेच ज्या दिवशी राफेल भारतात पोहोचले, त्या दिवशी देखील या अकाऊंटवरून ट्वीट (french president twitter) करण्यात आलंय. त्यात म्हंटलंय, “भारताचं अभिनंदन. एकदाची आम्ही राफेलची पहिली तुकडी भारतात पाठवू शकलो”

हे ट्वीट देखील जवळपास ३७०० युजर्सनी रिट्वीट केलंय.   

पडताळणी :

व्हायरल ट्वीटची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही संबंधित ट्वीटर हँडलला भेट दिली. त्यावेळी संबंधित अकाऊंट हे फ्रान्सचे राष्ट्रपती इमान्युल मॅक्रो यांचं पॅरोडी अकाऊंट असल्याचं समजलं. बायोमध्ये तसं स्पष्टपणे लिहिलेलं आहे.

हे अकाऊंट चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीपासून चालविण्यात येतंय. अकाऊंटला ७१२१ फॉलोअर्स असून त्यातील बहुतांश फॉलोअर्स भारतीय आहेत. अकाऊंटचं ट्वीटर हँडल @MacronEmmauel असं आहे.   

त्यानंतर आम्ही फ्रान्सचे राष्ट्रपती इमान्युल मॅक्रो यांच्या अधिकृत अकाऊंटला भेट दिली. @EmmanuelMacron   हे मॅक्रो यांचं अधिकृत ट्वीटर हँडल आहे. ते अकाऊंट ब्लू टिकने व्हेरीफाईड देखील आहे.  

मॅक्रो यांच्या अधिकृत अकाऊंटवरून राफेलसाठी भारताचं अभिनंदन करणारं किंवा शुभेच्छा देणारं कुठलंही ट्वीट आम्हाला सापडलं नाही. भारताला शुभेच्छा देणारं तर सोडाच, गेल्या साधारणतः आठवडाभरात राफेल या विषयावर कुठलंच ट्वीट या अकाऊंटवरून करण्यात आलेलं नाही.

वस्तुस्थिती :  

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की फ्रान्सचे राष्ट्रपती इमान्युल मॅक्रो यांनी राफेलसाठी भारताला शुभेच्छा दिलेल्या नाहीत किंवा भारताचं अभिनंदन देखील केलेलं नाही.

इमान्युल मॅक्रो यांच्या पॅरोडी अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्वीटला त्यांचं अधिकृत ट्वीट म्हणून मोठ्या प्रामाणात व्हायरल करण्यात येत आहे.   

हे ही वाचा- ‘जग भारताच्या बाजूने’ भासविण्यासाठी भाजप नेते घेताहेत फेक ट्वीटर अकाऊंट्सचा आधार!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा