Press "Enter" to skip to content

मशिदीत नमाज पढणाऱ्या शीख व्यक्तीचा पाच वर्षांपूर्वीचा फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल!

मेघना गुलजार दिग्दर्शित राजी चित्रपट ज्या ‘कॉलिंग सहेमत’ नावाच्या पुस्तकावर आधारित आहे, त्या पुस्तकाचे लेखक हरिंदर सिक्का यांनी ट्विटरवर आपल्या व्हेरीफाईड अकाऊंटवरून एक फोटो शेअर केलाय. त्यात ते म्हणतात की आधी तो युवक शेतकरी आंदोलनाच्या रॅलीमध्ये सहभागी झाला (Sikh man praying in mosque) आणि मशिदीत परत येण्यापूर्वी पगडी उतरवून ठेवायला विसरला”

सिक्का यांनी थेटपणे तो युवक मुस्लिम असल्याचं म्हण्टलेलं नाही. पण ते हीच गोष्ट सुचवू पाहत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये ते आंदोलकांना जिहादी, कम्युनिस्ट आणि देशद्रोही म्हणताहेत. सिक्का यांचं ट्विट २८५ युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

सरकार समर्थकांकडून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले आंदोलन खलिस्तानी, देशविरोधी शक्तींनी हायजॅक केले असल्याचे दावे यापूर्वी अनेकवेळा करण्यात आले आहेत.

सुप्रीम कोर्टात काल झालेल्या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारकडून देखील बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी संघटनेकडून आंदोलनाला रसद पुरविली जात असल्याची माहिती देण्यात आलीये. सरकारने यासंबंधी शपथपत्र दाखल करावे, असा आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमागचे सत्य नेमके काय हे शोधण्यासाठी आम्ही व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला ‘सिखअवेअरनेस’ नावाच्या वेबसाईटवर एका फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट मिळाला. त्या स्क्रिनशॉटनुसार शायख मोहोम्मद अस्लम नामक व्यक्तीच्या फेसबुक अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केला गेला असल्याचे आढळून आले.

फेसबुकवर शोध घेतला असता आम्हाला पोस्ट देखील मिळाली. फेसबुक पोस्टच्या कॅप्शनमध्ये शायख मोहोम्मद अस्लम लिहितात की,

“हा शीख व्यक्ती जुम्माच्या दिवशी मशिदीत आला. नमाज पढली आणि आश्चर्यकारकरित्या ‘अल्लाहू अकबर’ म्हणत सर्वांसमोर प्रार्थना केली. अल्लाहच्या कृपेने या उदार धर्माचा जगभर प्रसार होवो”

This Sikh man entered the mosque on the day of Jumm'ah, performed wudhu, and amazingly said "Allahu Akbar" and prayed in front of everyone. May Allah spread this beautiful religion across the world.

Posted by Shaykh Mohammed Aslam on Saturday, 30 January 2016

२०१६ मध्येच हाच फोटो आम्हाला अजून एका फेसबुक युजरच्या अकाउंटवरून शेअर केला असल्याचे देखील आढळून आले. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये देखील पोस्टकर्त्याने म्हंटलंय की, “मशिदीत नमाज अदा करणारा शीख बांधव. (Sikh man praying in mosque) हा माझा भारत आहे #proudIndain”

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोसोबत केला जाणारा दावा चुकीचा आहे. व्हायरल फोटो सध्याचा नसून जवळपास पाच वर्षे जुना आहे. म्हणजेच फोटोचा शेतकरी आंदोलनाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. शिवाय फोटोतील व्यक्ती मुस्लिम नसून शीख धर्मीय आहे.

हे ही वाचा- मुस्लीम व्यक्ती शीख बनून शेतकरी आंदोलनात सामील झाले? वाचा व्हायरल फोटोजचे सत्य!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा