Press "Enter" to skip to content

‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर’च्या को-प्रोड्युसरने राहुल गांधी यांची खिल्ली उडविण्यासाठी वापरला एडीटेड व्हिडीओ!

काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचे २ व्हिडीओज शेअर करून सोशल मिडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

Advertisement

‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचे को-प्रोड्युसर, ‘झी फाईव्ह’वरील  ‘द चार्जशीट’ या वेबसिरीजचे प्रोड्युसर आणि ‘भारतीय चित्रपट आणि मालिका संघटने’चे अध्यक्ष अशी ओळख अशोक पंडित यांच्या ट्विटरच्या बायोमध्ये आणि विकिपीडियावर आपण पाहू शकतो.

पंडित यांनी हे व्हिडीओज शेअर करताना ‘लो कर लो बात! कभी कभी हैरानी होती है उन लोगों पर जिनको इस शक्स में प्रधानमंत्री दिखता है! उन में हमारे फ़िल्म उद्योग के भी कुछ लोग शामिल हैं! इसका tuition टीचर कौन होगा ? ज़रा सोच कर बताइए!’ असं लिहिलंय.

काय आहेत हे व्हिडीओ?

पहिल्या चौकटीतील व्हिडीओत राहुल गांधी म्हणताहेत, “भारत माता को अपने बच्चो को एकदम पैसा देना चाहिये. क्योंकी आज उनको पैसे की जरुरत है.”

आणि दुसऱ्या चौकटीतील व्हिडीओत “’अगर हमने बहोत सारा पैसा गरीब लोगों को दे दिया, मजदूरों को दे दिया तो बाहर देशो मे गलत इम्प्रेशन चला जायेगा. हमारी रेटिंग खराब हो जायेगी. मै फिरसे दोहरा रहा हुं हिंदुस्तान की शक्ती बाहर से नहीं बनती है. हिंदुस्तान की शक्ती हिंदुस्तान के अंदरसे बनती है. हिंदुस्तान की इमेज हिंदुस्तान के बाहर नहीं हिंदुस्तान के अंदर बनती है. जब हिंदुस्तान मजबूत होता है’” असं म्हणत आहेत.

पहिल्या व्हिडीओत राहुल गांधी ‘पैसे द्या’ असं म्हणत आहेत आणि दुसऱ्या व्हिडीओत ‘पैसे देऊ नका’ असं म्हणत आहेत कारण हिंदुस्तानची इमेज खराब होईल. या विरोधाभासी वक्तव्यामुळे राहुल गांधी यांची खिल्ली उडवली जात आहे. ही बातमी लिहीपर्यंत एक हजारच्यावर लोकांनी पंडित यांचं ट्वीट रीट्विट केलं आहे.

पडताळणी:

राहुल गांधी यांचं हे वक्तव्य त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेतील आहे. हे पाहताक्षणी स्पष्ट होतंय, कारण ही प्रेस कॉन्फरन्स सर्वच माध्यमांनी लाइव्ह दाखवली होती. म्हणून मग ‘चेकपोस्ट मराठी’द्वारे आम्ही या दोन्ही व्हिडीओजच्या खरेपणाची पडताळणी करायला सुरुवात केली.

युट्युबवर जाऊन आम्ही ‘Rahul Gandhi live press conference’ हे किवर्ड्स टाकून सर्च केलं. वेगवेगळे व्हिडीओज समोर आले. त्यातील काही व्हिडीओज आम्ही बारकाईने ऐकले तेव्हा असं लक्षात आलं की हे दोन्ही वक्तव्ये दोन वेगवेगळ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदांमधले आहेत.

१६ मे २०२० रोजी झालेल्या परिषदेत राहुल गांधी पहिलं वाक्य बोलले आहेत. योयोटीवी लाइव्हने जे पत्रकार परिषदेचं लाइव्ह स्ट्रीम केलं आहे. त्या व्हिडीओच्या अगदी पहिल्या सेकंदालाच राहुल गांधी म्हणताहेत,

“मां जो होती है वो अपने बच्चो को कर्ज नहीं देती, वो एकदम पैसा देती है. भारत माता को अपने बच्चो के लिये साहुकार का काम नहीं करना चाहिये. भारत माता को अपने बच्चो को एकदम पैसा देना चाहिये. क्योंकी आज उनको पैसे की जरुरत है. जो मायग्रंट सडकपर चल रहे हैं उनको कर्ज की जरुरत नहीं है, उसे जेब में पैसे की जरुरत है. जो किसान तडप रहा हैं उसे कर्ज की नहीं पैसे की जरुरत है.”

दुसरी पत्रकार परिषद २६ मे रोजी घेतली होती. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर उपलब्ध असणाऱ्या व्हिडीओच्या १७.३५ मिनिटाला आपण राहुल गांधी यांचं वक्तव्य ऐकू शकतो. काय म्हणतायेत पहा:

“मैं देश को और नरेंद्र मोदीजी को केह रहा हुं. की आपने जो पॅकेज में किया है उससे कुछ नहीं होनेवाला है. एक प्रॉब्लेम है मै आपको बताता हुं. थोडीसी मेरी बातचीत जो डिसिजन मेकर है उनसे होती रेहती है. उनकी व्ह्युव है की अगर हमने बहोत सारा पैसा गरीब लोगों को दे दिया मजदूरों को दे दिया तो बाहर देशो मे गलत इम्प्रेशन चला जायेगा. हमारी रेटिंग खराब हो जायेगी.

मै फिरसे दोहरा रहा हुं हिंदुस्तान की शक्ती बाहर से नहीं बनती है. हिंदुस्तान की शक्ती हिंदुस्तान के अंदरसे बनती है. हिंदुस्तान की इमेज हिंदुस्तान के बाहर नहीं हिंदुस्तान के अंदर बनती है. जब हिंदुस्तान मजबूत होता है तब बाकी दुनिया देखती है और इमेज बनती है हमारी. शक्ती की रक्षा कैसे करनी है डायरेक्ट कॅश एकदम ५०% लोगोंको महिने के ७५०० रुपये, सबसे गरीब मजदुरों को देने चाहिये. ये हमारी स्ट्रेन्थ है. ये हमारा आत्मा है. इस्की रक्षा करनी है. विदेश क्या सोच रहा है उसके बारे में नहीं सोचना है अभी. वो बाद मे देखेंगे.”

वस्तुस्थिती:

  • ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे निदर्शनास आलं की अशोक पंडित यांनी शेअर केलेले राहुल गांधी यांचे दोन्ही व्हिडीओज दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधील आहेत.
  • दोन्ही ठिकाणी राहुल गांधी हेच सांगताहेत की गरिबांना, मजुरांना थेट पैसे द्यायला हवेत.
  • गरिबांना थेट पैसे दिल्याने देशाची ईमेज आणि रेटिंग खराब होईल असं मत राहुल गांधी यांचं नसून ते मत डिसिजन मेकर्सचं आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यात कसलाही विरोधाभास नाही. अशोक पंडित यांनी प्रोपोगंडा रेटण्यासाठी सोयीनुसार कट केलेले व्हिडीओज शेअर केले आहेत. त्यामुळे तथ्यांशी छेडछाड केलेल्या या व्हायरल ट्विटला आम्ही ‘चेकपोस्ट मराठी’ वरच अडवत आहे.

हेही वाचा:

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीत घोळ, एक सिलेंडर पडला तब्बल २२२१ रुपयांना?

More from राजकारणMore posts in राजकारण »

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा