Press "Enter" to skip to content

८ वर्षीय मुलाला काठीने मारहाण करणाऱ्या नराधमाच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य आले समोर!

केवळ ८ वर्षीय मुलाला काठी तुटेपर्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण करणाऱ्या एका इसमाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ त्या इसमाने स्वतःच्याच लहान मुलीला शूट करण्यास सांगितल्याचे दिसतेय.

Advertisement

व्हिडिओमध्ये बोलली जात असलेली भाषा मराठीच आहे. त्या नराधमाला पकडण्यासाठी हा व्हिडीओ व्हायरल करा, पोलिसांपर्यंत पोहचवा असे आवाहन करणारे मेसेज, फेसबुक पोस्ट्स या व्हिडीओसह जोरदार व्हायरल होत आहेत. ‘

Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक विजय चौधरी, जिजाभाऊ, डॉ. भारत पाटोळे, सुनील गिरकर, सुमित डोळे आणि विजय मोहिते यांनी व्हायरल व्हिडीओ निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

सूचना: व्हिडिओतील दृश्ये आपणास विचलित करू शकतात

https://youtu.be/ZBNuOYrAqXs

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स रिव्हर्स सर्च करून पाहिल्या तसेच काही कीवर्ड्सच्या मदतीने गुगल सर्च केले. यामध्ये आम्हाला व्हायरल व्हिडीओ विषयीची ‘झी न्यूज‘ची २८ नोव्हेंबर २०२१ रोजीची बातमी सापडली.

बातमीनुसार सदरील इसम दारूच्या नशेत असून ही घटना छत्रीनाका परिसरातील आहे. याच अनुषंगाने अधिक शोध घेतला असता ‘तेलंगाना टुडे‘ची २७ नोव्हेंबर रोजीची बातमी आम्हाला सापडली. बातमीनुसार घटना हैदराबादच्या छत्रीनाका परिसरातील आहे.

मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव अशोक घांते असून तो तृप बाजार येथील एका दुकानात सेल्समन म्हणून नोकरी करतोय. मुलाने काहीतरी चूक केली म्हणून त्यास शिक्षा देण्याच्या हेतूने त्याने असे केल्याचे त्याने सांगितले आहे. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

“आरोपी इसम नशेत होता, ८ वर्षीय पिडीत मुलास दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असून त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे.”

– अब्दुल खादीर गिलानी, पोलीस निरीक्षक, छात्रीनाका

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओ हैदराबाद येथील आहे. आरोपी इसमाविरुद्ध छ्त्रीनाका पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली असून कायदेशीर कारवाई चालू आहे. पिडीत मुलावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: लेकराला रक्तबंबाळ होईपर्यंत मारणाऱ्या महिलेच्या व्हायरल व्हिडीओजचे सत्य आले समोर

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा