Press "Enter" to skip to content

भारतीय माध्यमांनी दिली बालाकोट हवाई हल्ल्यात ३०० पाकिस्तानी मारले गेल्याची फेक बातमी!

साधारणतः दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ९ जानेवारी रोजी जवळपास सर्वच प्रमुख भारतीय माध्यमांमध्ये माजी पाकिस्तानी राजदूत जफर हिलाली यांच्या हवाल्याने बालाकोट हवाई हल्ल्यात ३०० पाकिस्तानी मारले गेल्याची (300 Pakistanis killed in Balakot) बातमी देण्यात आली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली असल्याने अनेक माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली.

एएनआयच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की माजी पाकिस्तानी राजदूत जफर हिलाली यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान २६ फेब्रुवारी २०१९ रोजी बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात ३०० पाकिस्तानी मारले गेले असल्याची कबूली (300 Pakistanis killed in Balakot) दिली आहे.

Advertisement
Balakote Airstrike news Kolaj
Source: ANI/India Today/DH/CNBC

अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी कुठलीही खातरजमा न करता ही बातमी प्रसिद्ध केली. न्यूज अँकर दीपक चौरासिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा दावा शेअर करत आता ‘सबूत गॅंग’ माफी मागणार का अशी डरकाळी फोडली. चौरासिया यांचं ट्विट अजून देखील उपलब्ध आहे. हे ट्विट जवळपास ६५०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलंय.

अर्काइव्ह ट्विट

पडताळणी:

‘बूम लाईव्ह’ या वेबसाईटने या दाव्याचं ‘फॅक्ट चेक’ केलंय. त्यात भारतीय माध्यमांनी दिलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. माजी पाकिस्तानी राजदूत जफर हिलाली यांच्या एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यानच्या व्हिडिओत छेडछाड करण्यात आली असून याच व्हिडीओच्या आधारे हे दावे केले गेले आहेत.

‘हम न्यूज’ या पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील ‘अजेंडा पाकिस्तान विथ अमीर जिया’ या चर्चेच्या कार्यक्रमात बोलताना जफर हिलाली यांनी दावा केला होता की भारताची जवळपास ३०० पाकिस्तानी मारण्याची योजना होती. मात्र त्यात ते (भारत) यशस्वी ठरू शकले नाहीत. हिलाली यांनी पुढे भारताकडून ३०० पाकिस्तानी मारले गेल्याची फेक न्यूज पसरविण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. ‘अजेंडा पाकिस्तान विथ अमीर जिया’ या कार्यक्रमाचा २३ डिसेंबर २०२० रोजीचा संपूर्ण एपिसोड युट्यूबवर उपलब्ध आहे. तो आपण बघू शकता.

भारतीय माध्यमांनी जफर हिलाली यांच्या हवाल्याने बालाकोट हवाई हल्ल्यात ३०० पाकिस्तानी मारले गेल्याची कबूली दिल्याचे दावे व्हायरल झाल्यानंतर हिलाली यांनी देखील ट्विटरवरून आपण अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य केलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मूळ व्हिडिओमध्ये छेडछाड करून चुकीचे दावे केले गेले असल्याचं त्यांनी सांगितलंय.

‘एएनआय’ची बातमी चुकीची असल्याचे समोर आल्यानंतर बऱ्याच माध्यमांच्या वेबसाइटवरून ही बातमी डिलीट करण्यात आली. ‘नवभारत टाईम्स’ने चूक मान्य करताना ३०० पाकिस्तानी मारले गेले असल्याचा दावा चुकीचा असल्याची बातमी देत चूक सुधारण्यात येत असल्याचं सांगितलं. एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर देखील हा दावा चुकीचा असल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. ‘कथित ‘सबूत गॅंग’कडे माफीनामा सादर करण्याची डरकाळी फोडणाऱ्या दीपक चौरासिया यांनी मात्र अद्यापपर्यंत आपलं ट्विट देखील डिलीट केलेलं नाही. 

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पाकिस्तानचे माजी राजदूत जफर हिलाली यांनी बालाकोट हवाई हल्ल्यात ३०० पाकिस्तानी मारले गेल्याची कबूली दिलेली नाही. हिलाली यांच्या छेडछाड करण्यात आलेल्या व्हिडिओच्या आधारे भारतीय माध्यमांनी चुकीच्या बातम्या दिल्या आहेत.

हे ही वाचा- पाकिस्तानच्या संसदेत लावण्यात आले ‘मोदी-मोदी’चे नारे?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा