श्रावण महिन्यातील सर्वात मोठी ‘गौरवान्वित’ बातमी समोर आली असून उत्तर प्रदेशातील संभलमध्ये (Sambhal) तब्बल ३५ वर्षांनी शिवलिंगावर (shiv mandir)जलाभिषेक झाला आहे. ते मन्दिर मुस्लीम जिहाद्यांनी बंद केले होते, असे दावे सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
'सावन माह की सबसे बड़ी और गौरवान्वित ख़बर सँभल में , 35 साल बाद शिवलिंग पर जल चढ़ाया गया। 18 जिहादी गिरफ़्तार। मुस्लिमो ने बंद करवाया हुआ था मंदिर, CM योगी ने 20 जिलों से भेजी पुलिस, खुला मंदिर सोचिए हम हिंदू लोग, अपना देश और पूजा नहीं कर सकते हैं , इससे बड़ी विडंबना क्या हो सकती है।'
या अशा मजकुराने सुरुवात झालेली लांबलचक पोस्ट RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, 🚩हिंन्दु राष्ट्र🚩, आर्यावर्त नवनिर्माण, मोदी गव्हर्नमेंट २.०, हिंदू राष्ट्र बनायेंगे, श्री राम युवा वाहिनी, कट्टर हिंदू साम्राज्य, मोदी लक्ष्य २०२४ अशा फेसबुक ग्रुप्सवरून व्हायरल होत आहे.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण फडणीस यांनी व्हॉट्सऍपवरही या पोस्टला मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केले जात असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणी’ची विनंती केली.
पडताळणी:
- ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची पडताळणी करताना मजकुराशी संबंधीत कीवर्ड्स गुगल सर्च केले. यामध्ये असे लक्षात आले की सदर दावे २०१७ सालापासून व्हायरल होत आहेत.
- या दाव्यांविषयी चौकशी करताना ‘आज तक‘ने उत्तर प्रदेशातील संभल (Sambhal) येथील एका पुरातन शिव मंदिराचे (shiv mandir) पुजारी जुगल किशोर यांच्याशी संवाद साधला होता.
“मुझे संभल और इस मंदिर में रहते हुए 17 साल से ज्यादा समय हो चुका है और अब तक मैंने इस तरह की किसी घटना के बारे में नहीं सुना है, न ही ऐसा कोई मंदिर देखा है जो सालों से बंद पड़ा हो. यहां ऐसी कोई बात नहीं हुई है, ये कोई अफवाह उड़ा रहा है.”
– जुगल किशोर, (शिवमंदिर पुजारी, संभल)
- याच दाव्यांविषयी ‘एबीपी न्यूज’ने ६ एप्रिल २०१७ रोजी विस्तृत बातमी प्रकाशित केली होती. एबीपीचे पत्रकार संभल मध्ये गेले आणि पोस्टमध्ये उल्लेख असलेल्या माजी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले,
”कुछ असामाजिक तत्व संभल का माहौल बिगाड़ने की साजिश रच रहे हैं और मनघड़ंत तस्वीर बना कर सोशल मीडिया के जरिये अफवाह फैला रहे हैं. ऐसे लोगों के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए.”
– शफीकुर्रहमान बर्क (माजी खासदार)
- ‘एबीपी न्यूज’ने सदर दाव्याविषयी संभल येतील पोलिसांकडेही चौकशी केली होती.
“सूचना बिलकुल झूठी अफवाह है इसका हम सोशल मीडिया में खंडन भी कर चुके हैं. ऐसा कोई मंदिर संभल में नहीं है जो बंद था और उस पर जल चढ़ाया गया हो. यहां जो मंदिर हैं उन पर नियमित रूप से अपनी पूजा पाठ और अनुष्ठान हो रहे हैं. किसी मंदिर पर यहां प्रतिबंध जैसी कोई बात नही है. यहां सब सामान्य रूप से अपना जीवन व्यतीत कर रहे हैं.”
– ब्रह्मपाल सिंह बाल्यान (सर्कल ऑफिसर, उत्तरप्रदेश पोलीस)
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये उत्तर प्रदेशातील संभल येथे मुस्लीम जिहाद्यांनी कब्जा केलेले शिवमंदिर तब्बल ३५ वर्षांनी उघडले गेल्याचा तसेच १८ जिहाद्यांना ताब्यात घेतले इत्यादी दावे करणारी व्हायरल पोस्ट निराधार आणि निखालस खोटी असल्याची स्पष्ट झाले.
हेही वाचा: बद्रीनाथ मंदिरात नमाज पढून मुस्लीम समुदायाने ते मंदिर नसून बद्रुद्दिन शाह दर्गा असल्याचा दावा केलाय?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment