Press "Enter" to skip to content

थर्माकॉल पासून साखर बनवली जातेय? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

एका कारखान्यातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. दावा केला जातोय की व्हिडीओ मध्य प्रदेशातील देवास येथील असून तेथे थर्माकॉल पासून साखर (Sugar from thermocol) तयार केली जात होती. वेगवेगळ्या मॉल आणि सुपर मार्केटमध्ये या साखरेचा पुरवठा केला जात होता. पोलिसांनी छापा टाकून काही लोकांना अटक केलीय.

Advertisement

फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सऍपवर या दाव्यांचे व्हायरल होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र गवस, ए.डी.चुरी, राजेंद्र काळे आणि बळीराम पाटील यांनी पडताळणीची विंनती केली.

sugar from thermacol facebook claims
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांच्या अनुषंगाने काही कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता ट्विटरवर देवास जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेले ट्विट मिळाले. या ट्विटमध्ये सदर दावे फेक असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा प्रकारची कुठलीही घटना निदर्शनास आली नाही, ना ही अशी कुठली कारवाई झालीय, असे या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.

थर्माकॉल पासून साखर तयार केली जातेय?

नाही, व्हायरल व्हिडीओमध्ये साखर नव्हे तर थर्माकॉल रिसायकल म्हणजेच पुनर्वापर करण्यासाठी लागणारे ‘ग्रॅन्यूएल्स’ तयार केले जात आहेत. या दाण्यांपासून पुन्हा विविध आकाराच्या थर्माकॉलच्या वस्तू तयार केल्या जातात. या एकूणच प्रोसेसकरिता लागणारा वेळ, खर्च आणि यंत्र सामुग्री पाहता उसापासून तयार होणारी साखर जास्त सोपी आणि किफायतशीर आहे, हे सहज लक्षात येईल. या एकूणच ‘थर्माकॉल रिसायकलींग’ (Thermocol Recycling)प्रोसेसविषयी खालील व्हिडीओमध्ये आपणास माहिती मिळेल.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत थर्मोकॉल पासून साखर (Sugar from thermocol) तयार केली जात असल्याचे दावे फेक असल्याचे निष्पन्न झाले. व्हायरल व्हिडीओ थर्माकॉल पासून साखर नव्हे तर रिसायकलींगसाठीचे ग्रॅन्यूएल्स तयार करण्यासाठीचा आहे. तसेच ज्या ठिकाणी ही घटना घडल्याचे सांगितले जातेय त्या देवास जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केलेय.

हेही वाचा: जागतिक आरोग्य संघटनेने पिशवीतल्या दुधामुळे ८७% भारतीय कॅन्सरग्रस्त होणार असल्याचा इशारा दिलाय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा