Press "Enter" to skip to content

पाकिस्तानला वाईट वाटलं म्हणून कॉंग्रेस सरकारने मोहोम्मद रफींच्या गाण्यावर बंदी आणली होती?

मोहम्मद रफी (Mohammad Rafi) यांचे ‘कश्मीर है भारत का, कश्मीर ना देंगे’ असे बोल असणारे गाणे केवळ पाकिस्तानला वाईट वाटले म्हणून कॉंग्रेसने ‘बॅन’ केले. रिलीज होऊ दिले नाही. अशा प्रकारचे दावे सोशल मीडियात व्हायरल होताहेत.

Advertisement

‘ह्याच रफी ह्यांनी गायलेल्या गाण्याने पाकिस्तान ला मिर्च्या झोंबल्या होत्या.आणि त्यांनी भारत सरकारला ह्या गाण्यावर बंदी आणा यला लावली.आणि आणि त्यावेळच्या सरकारने आणली पण तेच हे दुर्मिळ गाणे.पूर्ण ऐका.फार कमी ऐकायला मिळत. जयहिंद’

अशा कॅप्शनसह ५.१३ मिनिटाचा गाण्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियात अनेकांनी शेअर केला आहे.

अर्काइव्ह लिंक

फेसबुकवरही हे असे दावे अनेकांनी केले आहेत.

Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुयोग देशमुख यांनी हेच दावे व्हॉट्सऍपवर देखील व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी संबंधित कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता असेच दावे हिंदीमध्ये २०१९ साली व्हायरल झाले होते असे लक्षात आले.

  • १९६६ साली रिलीज झालेल्या ‘जोहार इन काश्मीर’ (Johar in Kashmir)या चित्रपटातील ‘जन्नत की है तस्वीर’ नावाचं हे गाणं आहे. हे गाणं ‘मोहम्मद रफी लव्हर्स’ या युट्युब चॅनलवर २०१७ सालापासून उपलब्ध आहे. जर त्यावर बंदी असती तर एवढ्या वर्षांत ते वेबवरून हटवलं असतं किंवा भारतीय युजर्सला ते पाहण्याची बंदी तरी असती.
  • चित्रपटाचे, गाण्याचे नाव टाकून गुगल सर्च केल्यानंतर सदर गाणे किंवा चित्रपटावर बंदी आणल्याची एकही बातमी आम्हाला सापडली नाही.
  • २०१९ साली ‘अल्ट न्यूज’ने या दाव्यांविषयी रिपोर्ट केला होता. त्यावेळी त्यांना १९६६ सालचे ‘भारतीय राजपत्र‘ मिळाले. त्यात त्यांनी सेन्सॉर बोर्डने या संबंधित गाण्याविषयी काय सूचना दिल्या होत्या ते शोधून काढले.
  • सेन्सॉर बोर्डाने या गाण्यावर बंदी आणण्यासंबंधी एकही टिप्पणी केली नाही. केवळ गाण्यातील ‘हाजी पीर’ हे शब्द काढून टाकण्याची सूचना करण्यात आली होती. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या या गाण्यात ‘हाजी पीर’ शब्द नाही याचा अर्थ सेन्सॉर बोर्डाची सूचना मान्य करूनच गाणे रिलीज केले आहे.
Source: Alt News

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे की पाकिस्तानला वाईट वाटलं म्हणून कॉंग्रेस सरकारने मोहम्मद रफींच्या गाण्यावर बंदी आणल्याचे व्हायरल दावे फेक आहेत . ‘जोहार इन काश्मीर’ या १९६६ साली रिलीज झालेल्या चित्रपटातील चित्रपटातील गाणे आजही युट्युबवर उपलब्ध आहे.

हेही वाचा: कॉंग्रेसने मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या फाईव स्टार होस्टेलमध्ये हिंदूंना प्रवेश नाही?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा