Press "Enter" to skip to content

‘पुलवामा हल्ला भाजपची नियोजनबद्ध चाल होती’, विंग कमांडर अभिनंदन यांचा खुलासा? वाचा सत्य!

नरेंद्र मोदींना निवडणूक जिंकण्यासाठी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान मदत करतायेत, पुलवामा हल्ला (Pulwama attack) आणि त्यानंतरचा बालाकोट एअर स्ट्राईक (Balakot Air Strike) नियोजनबद्ध होते. विंग कमांडर अभिनंदन (Abhinandan) वर्तमान यांनी असा खुलासा केल्याचे दर्शवणारे वर्तमानपत्रातील कात्रण व्हायरल होतेय.

Advertisement

व्हायरल कात्रणातील मजकूर:

‘पुलवामा हमला बीजेपी की सोची समझी साजिश थी और पाकिस्तानप्र नकली हमला करवाया, मोदी को चुनाव जितने के लिये इमरान खान मदद कर रहा है. बालाकोट पर बमबारी इम्रान खान की सहमतीसे हुई.- विंग अभिनंदन’

अशी प्रतिक्रिया आणि त्यावर ठळक अक्षरात ‘अभिनंदन का बयान’ असे लिहिलेले दिसत आहे.

Source: Whatsapp

फेसबुकवरही हे कात्रण जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

Abhinandan Varthman fake statement cutting viral on FB
Source: Facebook

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक वाघेश साळुंखे यांनी आमच्या ‘9172011480’ या व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क करून सदर व्हायरल कात्रण निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

  • दाव्यातील आरोप फार मोठा आणि खळबळजनक आहे याविषयीच्या बातम्या केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय माध्यमांतही झाल्या असत्या परंतु ‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने गुगल सर्च केल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांनी असे काही बोलल्याची एकही बातमी आम्हाला मिळाली नाही.
  • पाकिस्तानने अभिनंदन यांना पकडले, भारताकडे सुपूर्द केले. या काळातल्या बातम्यांनंतर अभिनंदन फारसे काही जनतेच्या समोर आल्याचे आढळले नाही, मग या बातमीचे कात्रण कशाच्या आधारावर?
  • आम्ही कात्रणाची ईमेज रिव्हर्स सर्च करून पाहिली तेव्हा आम्हाला दैनिक जागरणची बातमी सापडली. विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावे सोशल मीडियात काहीही मनमानी दावे व्हायरल होत असल्याचे आणि ते फेक असल्याचे सांगणारी ती बातमी होती.
  • याच बातमीचा छोटासा भाग कापून व्हायरल केला जात आहे.
Dainik jagran fact check news about wing commander Abhinandan
Source: Dainik Jagran

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल दावे फेक आहेत. याच विषयी ‘दैनिक जागरण’ने केलेल्या बातमीचे कात्रण चुकीच्या संदर्भासह व्हायरल करण्याचा हा कुणातरी मोदी सरकार विरोधकाचा खोडसाळपणा आहे. (Abhinandan Pulwama attack)

हेही वाचा: पेट्रोलवर राज्य सरकार तब्बल ४१.५५ रुपये टॅक्स वसूली करत असल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा