Press "Enter" to skip to content

अब्दुल कलाम यांनी आतंकवादाला आळा घालण्यासाठी मदरसे बंद करण्याचा सल्ला दिला होता?

भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम (Abdul Kalam) यांनी मुस्लीम मदरशांना (Madarsa) आतंकवादाचे मूळ संबोधल्याचे दावे केले जात आहेत. एका जुन्या वृत्तपत्राच्या कात्रणावर कलाम यांचे वक्तव्य असल्याचे दिसून येत आहे. ते कात्रण सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतेय.

Advertisement

“मुसलमान पैदाइशी आतंकवादी नहीं होते. उन्हें मदरसोंमें कुरान पढाई जाती है, जिसके अनुसार वे हिंदू, बौद्ध, सिख, ईसाई, यहुदी और अन्य गैर मुसलमानोंको चून चूनकर मारते है. आतंकवादपर नियंत्रण के लिये भारत में चल रहे हजारो मदरसोंपर नियंत्रण के लिये भारत में चल रहे हजारो मदरसोंपर प्रतिबंध लगाना बहूत जरुरी है.”

– ए.पी.जे.अब्दुल कलाम

असा त्या कात्रणाचा मजकूर आहे. त्यावर ‘एक अनमोल पेपर कटिंग जिसे लोगोंने महत्व नहीं दिया’ असे लिहिलेले आहे.

Source: Whatsapp

ते कात्रण व्हॉट्सऍपवर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय की त्यावर आपोआपच ‘फॉरवर्डेड मेनी टाईम्स’चा टॅग दिसून येतोय. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील आणि अजीव पाटील यांनी पडताळणीची विनंती केली आहे.

पडताळणी:

व्हायरल कात्रणातील मजकुरानुसार आम्ही विविध कीवर्ड्सच्या आधारे गुगलसर्च करून पाहिले परंतु एकाही वृत्तपत्राची किंवा वृत्तवाहिनीची बातमी मिळाली नाही.

अब्दुल कलाम (Abdul Kalam) हे केवळ राष्ट्रपती नव्हते तर संघर्षातून तयार झालेला शास्त्रज्ञ म्हणून त्यांची लोकप्रियता राष्ट्रपती होण्या अगोदरच खूप मोठी होती. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे खळबळजनक वक्तव्य करूनही एकाही माध्यमाने दखल न घेणे हे अशक्य आहे.

कलाम यांच्या नावे हेच वक्तव्य शेअर चॅटवर मागच्या दोन वर्षांपासून व्हायरल होत आहे. परंतु त्यात कुठल्या बातमीचे कात्रण नव्हे तर ग्राफिक्स दिसत आहे.

Source: Sharechat

याच ग्राफिक्सचा मागोवा घेतला असता असे लक्षात आले की सर्वात पूर्वी म्हणजे २०१४ साली संजय तिवारी नावाच्या व्यक्तीच्या ब्लॉगवरून ते पब्लिश झाले होते.

संजय तिवारी उजाला असे स्वतःचे नाव लिहिणाऱ्या या व्यक्तीचे ट्विटर प्रोफाईल पाहिल्यास असे लक्षात येते की ‘हिंदुस्तान पीपुल’ या नावाचे पाक्षिक हा व्यक्ती चालवत होता. नरेंद्र मोदी यांचा समर्थक आणि अरविंद केजरीवाल यांचा कट्टर विरोधक आहे. एवढा कट्टर की थेट भाषेची मर्यादा ओलांडली जाईल असे ट्विट्स करणारा हा व्यक्ती आहे.

२०१४ सालानंतर या व्यक्तीचे एकही ट्विट दिसत नाही. तसेच त्या पाक्षिकाचेही इंटरनेटवर कुठेच संदर्भ उपलब्ध नाहीत. याच पाक्षिकाचे ते व्हायरल झालेले कात्रण असल्याची शंका आहे.

अब्दुल कलाम यांच्या सदर वक्तव्याविषयी त्यांचे पुतणे आणि अब्दुल कलाम (Abdul Kalam) इंटरनॅशनल फाउंडेशनचे व्यवस्थापकीय ट्रस्टी शेख सलीम यांच्याकडे ‘अल्ट न्यूज‘ने चौकशी केली असता त्यांनी हे व्हायरल दावे फेटाळून लावले. तसेच कलाम यांनी कधीच कुठल्या धर्माविषयी अशा पद्धतीने वक्तव्य केले नसल्याचेही स्पष्ट केले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आतंकवादाला आळा घालण्यासाठी मदरसे (Madarsa) बंद करण्याचा सल्ला दिल्याचे, तसेच आतंकवादाचे मूळ मुस्लीम मदरसे असल्याचे वक्तव्य कधीही केले नसल्याचेच स्पष्ट झाले. व्हायरल दावे आणि ते वृत्तपत्राचे कात्रण फेक आहे.

हेही वाचा: झाकीर नाईकच्या ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’कडून हिंदू वेद-उपनिषदांमध्ये चुकीचे बदल केले जाताहेत?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा