समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या आयटी सेलकडून पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्वांचल भागात 2000 नव्या मस्जिद, अयोध्या बाबरी मशिदीसाठी 1000 कोटी निधी, अयोध्येचं नामांतर अशा प्रकारच्या मुस्लीम धार्जिणी आश्वासने दिली जात असल्याचे दावे व्हायरल होत आहेत.
“पश्चिमी यूपी और पूर्वांचल में 2000 नई मस्जिद बनाई जायेगी, अयोध्या में बाबरी मस्जिद के लिए हजार करोड़ रुपये दिए जाएंगे, अयोध्या का नाम परिवर्तन किया किया जाएगा, दलितों और पिछड़ों का आरक्षण कम करके मुसलमानों को 30% आरक्षण दिया जाएगा, लव जेहाद कानून को खत्म किया जायेगा, यह वादा है मेरा मुसलमानों से. … -अखिलेश यादव”
अशा मजकुरासह अखिलेश यादव यांचा फोटो असणारे ग्राफिक्स व्हायरल केले जात आहे. त्यासोबत दावा केला जातोय की ‘“समाजवादी पार्टी के आईटी सेल द्वारा यूपी मे मुसलमानो के व्हाट्सऐप पर भेजा जा रहा है, इस मैसेज को 100 करोड़ हिंदुओं के पास खासकर यूपी के एक-एक हिंदुओं के पास भेजो. 300 यूनिट फ्री बिजली के चक्कर हिंदू बर्बाद हो जाएंगे”.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक कौस्तुभ राऊत, अनिल गायकवाड आणि मिलिंद चिटणीस यांनी हे दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाकडून मुस्लीम धर्मियांच्या संतुष्टीसाठी एवढी मोठी आश्वासने दिली जात असल्याची दखल राष्ट्रीय माध्यमांनी घेतली असणारच, हे जाणून ‘चेकपोस्ट मराठी’ने अशाप्रकारच्या बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला परंतु अशी कुठेही बातमी मिळाली नाही.
‘आज तक’ने या दाव्याची पडताळणी करण्यासाठी समाजवादी पक्षाचे प्रवक्ते नासीर सलीम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे दावे फेक असल्याचे सांगितले. तसेच पक्षाच्या ‘फॅक्ट चेक’ ट्विटर हँडलवर देखील हे व्हायरल ग्राफिक फेक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही आश्वासने निवडणुकांना समोर ठेऊन दिली गेली असती तर पक्षाच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरून किंवा नेत्यांकडून हे दावे खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले गेले नसते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मुस्लीम धार्जिणी आश्वासने दिल्याचे व्हायरल ग्राफिक फेक आहे. 2000 नव्या मशिदी, बाबरी मशिदीस 1000 कोटींचा निधी यांसारखी आश्वासने अखिलेश यादव यांनी दिली नाहीत.
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]