Press "Enter" to skip to content

महात्मा गांधी यांच्या विषयीच्या ‘असत्या’च्या प्रयोगांची पोलखोल!

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४४ साली आपल्या रेडीओवरील भाषणातून सार्वजनिकरीत्या ज्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले त्या महात्मा गांधी यांची जयंती! याच औचित्यावर त्यांच्या समर्थक आणि विरोधक दोहोंकडून व्हायरल झालेल्या पाच महत्वाच्या फेक फोटोजची (Mahatma gandhi fake news) पोलखोल.

१. दावा: राष्ट्रपित्याचा अंतिम क्षण! एका शिंप्याने जपून ठेवला गांधी हत्येचा दुर्मिळ फोटो.

हातात पिस्तूल घेऊन उभा असलेला नथुराम गोडसे आणि त्याच्यासमोर उभे असलेल्या महात्मा गांधींचा फोटो फेसबूक, ट्विटरवर व्हायरल करण्यात आला होता. अमर उजाला, सबरंग इंडिया या पोर्टल्सवर तसेच शेअरचॅट आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियातही हा फोटो याच दाव्यांसह शेअर करण्यात आला होता.

Advertisement
Source: wholedude.com

वस्तुस्थिती:

नथुराम गोडसेचा फोटो आपण बघितलेला असेल तर व्हायरल फोटोचा खोटेपणा (Mahatma gandhi fake news) लगेच आपल्या लक्षात येईल. हा फोटो महात्मा गांधींच्या हत्येचा नसून १९६३ साली मार्क रॉबसन यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि स्टॅनले वोल्पर्ट लिखित कादंबरीवर आधारित ‘Nine Hours To Rama’ या चित्रपटातील आहे. होर्स्ट बुचोल्झ या जर्मन अभिनेत्याने गोडसेचे पात्र साकारले आहे.

अलामी या आंतरराष्ट्रीय ईमेज स्टॉक करणाऱ्या वेबसाईटवर चित्रपटाच्या प्रसंगांचे केलेले छायाचित्रण पाहू शकता. तसेच हा संपूर्ण चित्रपट युट्युबवर सुद्धा उपलब्ध आहे.

Mahatma Gandhi assassination rare photo checkpost marathi fact check

२. दावा: गांधीजींच्या हत्येनंतर नथुरामला दोन हिंदूंनी पकडून ठेवल्याचा दुर्मिळ फोटो.

नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर तीन गोळ्या चालवल्यानंतर त्यास दोन हिंदू कार्यकर्त्यांनी पकडून ठेवले. समोर गांधीजींचा देह धरतीवर कोसळला होता. याच ३० जानेवारी १९४८ रोजीच्या प्रसंगाचा दुर्मिळ फोटो म्हणून सोशल मीडियात अनेकांनी शेअर केला आहे. अगदी पाकिस्तनमधील इफ्तिकार चौधरी या व्यक्तीने देखील याच कॅपशनसह हा फोटो फेसबूकवर शेअर केलाय.

A rare Pic of Mohatama Gandhi's Murder — Hindu extremist RSS worker Nathuram Godse, the man who killed Gandhi, – was…

Posted by Iftikhar Chaudri on Sunday, 29 September 2019

अर्काईव्ह लिंक

वस्तुस्थिती:

काही रिपोर्ट्सनुसार नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्यानंतर तेथून निसटण्याचा प्रयत्न केला नव्हता. अगदी काही वेळात तिथे पोलीस आले आणि त्यांनी त्यास ताब्यात घेतले.

रिव्हर्स इमेज सर्चद्वारे हा व्हायरल फोटोसुद्धा १९६३ साली मार्क रॉबसन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘Nine Hours To Rama’ या चित्रपटातील असल्याचेच समजले. व्हायरल फोटो चित्रपटात गांधीच्या मृत्युप्रसंगी करण्यात आलेल्या चित्रीकरणाचे आहेत.

चित्रपटविषयक माहिती देणाऱ्या IMDB या वेबसाईटच्या फोटो गॅलरीमध्ये आपणास हा फोटो पहावयास मिळेल.

Mahatma Gandhi assassination by RSS rare photo checkpost marathi fact check

३. दावा: गांधीजी मीठ सत्याग्रहासाठीच्या दांडी यात्रेत नातवाला घेऊन गेले होते!

महात्मा गांधींची काठी हातात धरून पुढे जाणाऱ्या त्यांच्या नातवासोबतचा म्हणजेच कनू रामदास गांधी यांचा फोटो हा दांडी यात्रेतील असल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात आला होता.

नासामध्ये २५ वर्षे वैज्ञानिक म्हणून कार्यरत असणाऱ्या कनू गांधी यांचे २०१६ साली वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. यावेळी हिंदुस्थान टाइम्स, नवभारत टाइम्स, डेली मेल या न्यूज वेबसाईटवर देखील याच दाव्यासह हा फोटो शेअर करण्यात आला.

अर्काईव्ह लिंक

वस्तुस्थिती

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण वेबसाइटवर Mahatma- Life of Mohandas Karamchand Gandhi या पुस्तकात या फोटो विषयी माहिती देण्यात आलीय.

उपलब्ध माहितीनुसार हा फोटो दांडी यात्रेतील नसून डिसेंबर १९३७ मध्ये मुंबई जवळील जुहू बीचवर काढण्यात आलाय. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर देखील व्हायरल फोटो जुहू बीचवरील असल्याचे ट्विट करण्यात आलंय.

४. दावा: दोन महान व्यक्ती, महात्मा गांधी व आणि दलाई लामा यांच्या भेटीचा दुर्मिळ क्षण!

महात्मा गांधी आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामा या दोन महान व्यक्तींच्या भेटीचा दुर्मिळ क्षण म्हणत एक फोटो व्हायरल करण्यात आला होता. यात गांधी यांच्या शेजारी असणारा लहान मुलगा म्हणजे ४ वर्षीय दलाई लामा असल्याचा दावा केला गेला होता.

अर्काइव्ह लिंक

वस्तुस्थिती:

व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या लहान मुलाचा फोटो तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाच आहे. मात्र गांधी आणि लामा यांचे वेगवेगळे फोटो एडीट करून (Mahatma gandhi fake news) व्हायरल फोटो तयार करण्यात आलाय.

फोटो संग्रह करणाऱ्या गेट्टी इमेज या साईटनुसार महात्मा गांधी यांनी ३ नोव्हेंबर १९३१ रोजी गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी लंडनला भेट दिली होती. त्यावेळी लंडनयेथील ’10 Downing Street’वर महात्मा गांधी यांचा फोटो काढण्यात आला होता.

दलाई लामा यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनूसार लामा यांचा जन्म ६ जुलै १९३५ रोजी झाला. म्हणजेच गांधीजींचा फोटो घेण्यात आल्यानंतरच्या जवळपास ४ वर्षांनी.

वेबसाईटवर व्हायरल फोटोतील मूळ फोटो देखील देण्यात आलाय हा फोटो चीनमधील कुंबम मोनेस्ट्रीबाहेर काढला आहे. एवढेच नव्हे तर दलाई लामा यांनी २००७ साली हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपण कधीही गांधींना भेटलेलो नाही असे सांगितले होते.

Mahatma gandhi with Dalai Lama viral pic checkpost marathi fact check

५. दावा: महात्मा गांधी ब्रिटीश महिलेसोबत आक्षेपार्ह जवळीक साधताना..

‘चमचों तुम्हारे राष्ट्रपिता कर क्या रहे हैं?’ या कॅपशनसह महात्मा गांधीचा एका ब्रिटीश महिलेसोबतचा आक्षेपार्ह जवळीक साधतानाचा फोटो ट्विटर, फेसबुक, युट्यूब वर व्हायरल करण्यात आला होता. अजूनही हे असे फोटोज विविध माध्यमांतून व्हायरल होत असतात.

अर्काईव्ह लिंक

वस्तुस्थिती:

व्हायरल फोटो गूगल इमेज सर्च केला असता असोसिएट प्रेस या वेबसाईटवर वर मूळ फोटो आढळला. मुंबई येथे ६ जुलै १९४६ रोजी झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत जवाहरलाल नेहरूंसोबत गांधींचा हा फोटो मॅक्स देस्फोर या छायाचित्रकाराने काढला होता. मूळ फोटोतील नेहरूंना काढून इमेज क्रॉप करत शेजारी त्या महिलेचा फोटो लावण्यात आलाय.

Mahatma Gandhi with woman in intimacy fake photo checkpost marathi fact check

हेही वाचा: काँग्रेस नेत्यांनी तुरुंगात शहीद भगतसिंह यांची भेट न घेतल्याच्या दाव्यात किती तथ्य?

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा