Press "Enter" to skip to content

बिपीन रावत यांनी सेनाध्यक्ष मनोज नरवणे यांना हटविण्याची शिफारस केलीये का ?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिण्यात आलेलं एक पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतंय.

या पत्रानुसार देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांनी सेनाध्यक्ष मनोज मुकुंद नरवणे (Manoj Mukund Naravane) आणि लेह येथील सैन्य दलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांना हटविण्याची शिफारस केली आहे.

Advertisement

राजनाथ सिंह यांच्या सहीनिशी असणारं हे पत्र त्यांच्याच लेटरपॅडवर असल्याचं देखील दिसतंय.

rajnath singh's fake letterhead

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या या पत्रात राजनाथ सिंह म्हणतात,

“आपल्या आदेशाप्रमाणे गल्वान खोऱ्यात भारतीय सैन्याची जीवितहानी नेमकी का झाली यासंबधी चौकशी आयोग गठीत करण्यात आला होता. 

चौकशी आयोग या निष्कर्षाप्रत पोहोचलाय की सेनाध्यक्ष मनोज मुकुंद नरवणे आणि लेह येथील सैन्य दलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांना परिस्थितीचा योग्य अंदाज आला नाही.

या दोघांच्या अकुशल वर्तनामुळे केवळ भारतीय सैनिकांचा जीवच गेला नाही, तर भारतातच्या चकाकत्या प्रतिमेस देखील काळिमा फासला गेला आहे. 

गल्वान खोऱ्यातील तसेच भूतकाळातील देखील कामगिरीच्या आधारे जनरल बिपीन रावत यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना हटविण्याची शिफारस केली आहे”     

पडताळणी:

पत्रात वापरण्यात आलेली भाषा ही पत्राच्या सत्येतेविषयी शंका उपस्थित करणारी आहे. शिवाय पत्रात व्याकरणाच्या आणि स्पेलिंगच्या चुका देखील आहेत.

आम्ही पडताळणी केली असता कुठल्याही महत्वाच्या न्यूजपेपरमध्ये अथवा न्यूज चॅनेलला आम्हाला यासंबंधीची बातमी सापडली नाही. त्यानंतर आम्ही संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन शोधाशोध केली, परंतु तिथे देखील यासंबंधी कुठलीही बातमी अथवा पत्र आढळले नाही.  

शेवटचा पर्याय म्हणून गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या ट्विटर अकाऊंटवर शोध घेतला अशा प्रकारचं कुठलंही पत्र आम्हाला मिळालं नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमू दौऱ्यातील काही फोटोज मात्र आम्हाला मिळाले, जिथे सीडीएस बिपीन रावत आणि सेनाध्यक्ष नरवणे हे दोघेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसताहेत.

वस्तुस्थिती  

‘चेकपोस्ट मराठी’ने बरीच शोधाशोध करून देखील पत्राची सत्यता पटवणारा कुठलाही पुरावा आम्हाला मिळाला नाही.

उलट कुठल्याही मुख्य माध्यमात यासंबंधीची बातमी नसणे आणि पत्रातील भाषा आणि व्याकरणातील चुका हे ते फेक असल्याचंच सांगताहेत. 

फोटोशॉप अथवा अन्य तत्सम एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने राजनाथ सिंह यांच्या लेटर पॅडवर हे बनावट पत्र बनवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

हे ही वाचा- ‘नंबर 140 चा कॉल उचलू नका’ फेक मेसेजमध्ये ‘सोनी लिव्ह’च्या प्रोमोशनची भर!

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा