Press "Enter" to skip to content

‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले? वाचा सत्य!

दूध आणि दुग्ध पदार्थांच्या निर्मितीमधील महत्वाची कंपनी असलेल्या अमूल (Amul) संदर्भात सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. दावा केला जातोय की कंपनीच्या मालकाने ‘थुक जिहाद’मुळे (thook jihad) १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यासाठी कंपनीचे आभार देखील मानले जात आहेत.

Advertisement

“अमूल दूध के मालिक आनंद सेठ ने अपने फैक्ट्री से 1 लाख 38 हजार थूक जिहाद वाले लोगो को निकाला क्योंकि अमूल दूध पिता है इंडिया अमूल कंपनी को दिल से आभार!!” असा मेसेज ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

  • अमूल हा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा महत्वाचा ब्रँड आहे. अमूलने जर १ लाख ३८ हजार इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्याना नोकरीवरून काढून टाकायचा निर्णय घेतला असता तर तो सहाजिकच राष्ट्रीय बातमीचा विषय झाला असता.
  • आमच्या पडताळणी दरम्यान आम्हाला अशा प्रकारची कुठलीही बातमी आढळून आली नाही. सध्या अमूलने फक्त दुधाचे भाव वाढविल्याच्याच बातम्या माध्यमांमध्ये बघायला मिळताहेत.
  • अमूलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर देखील कुठल्याही कर्मचाऱ्यांना व्हायरल दाव्यातील थुक जिहादमुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याविषयीची कुठलीही माहिती मिळाली नाही.
  • ‘अमूल’चे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोढी यांनी देखील व्हायरल दावा फेक असल्याचे सांगत हा दावा फेटाळून लावला आहे. बीबीसीशी बोलताना आर.एस. सोढी सांगतात, “आम्हाला जराही कल्पना नाही की अशा प्रकारच्या बातम्या कुठून आल्या आहेत. गेल्या दोन वर्षात आम्ही आमच्या एका कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढलेले नाही कारण आपला व्यवसाय दिवसेंदिवस वाढतोय. आम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून काढायचं ठरवलं, तरी तो धर्माच्या आधारावर कधीच घेतला जात नाही.”
  • व्हायरल दाव्यात अमूल कंपनीचे मालक म्हणून आनंद सेठ अशा व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे, पण गमतीशीर गोष्ट अशी की अमूलशी संबंधित अशी कुठलीही व्यक्ती अस्तित्वातच नाही. विशेष म्हणजे ‘अमूल’ ही काही खासगी कंपनी नाही. ‘अमूल’चे संचालन ‘गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ’ या सहकारी संस्थेमार्फत केले जाते. संस्थेचे मुख्यालय गुजरातमधील ‘आणंद’ या ठिकाणी आहे.
  • अमूलची स्थापना १९४६ साली करण्यात आली. ‘अमूल’च्या स्थापनेत देशातील धवलक्रांतीचे प्रणेते डॉ. वर्गीस कुरिअन (Dr. Verghese Kurien) आणि त्रिभुवनदास पटेल (Tribhuvandas Patel) या दोघांचे फार मोठे योगदान राहिलेले आहे. आजघडीला जवळपास ३६ लाख दूध उत्पादक शेतकरी ‘अमूल’वर अवलंबून आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियात अमूल (Amul) दुधासंदर्भातील ‘थुक जिहाद’चा (thook jihad) व्हायरल दावा चुकीचा आहे. ‘अमूल’ने आताच काय तर गेल्या कित्येक वर्षांपासून कुठल्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढलेले नाही.

हेही वाचा- दिलीप कुमार यांनी सर्व संपत्ती मुस्लिम वक्फ बोर्डाला दान केली आहे का?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा