Press "Enter" to skip to content

गरम पाणी किंवा कडक ऊन कोरोना व्हायरस पासून वाचवू शकत असल्याचे दावे खोटे

“आपल्याला सहजासहजी कोरोना व्हायरस होणार नाही आणि कोरोना आपल्याकडे आला तरी केवळ गरम पाणी पिऊन तो पळवता येतो, जमल्यास थोडा वेळ उन्हात बसा गरम वातावरणात हा विषाणू आपोआपच मरतो 30 डिग्री. हा व्हिडीओ पूर्ण पहा खात्री करा आणि टेन्शन फ्री जीवन जगा.” या कॅप्शन सोबत नामदेवराव जाधव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Advertisement

व्हिडीओमध्ये कोरोना संसर्ग कसा होतो, त्यापासून आपला बचाव कसा करायला हवा, याविषयी नामदेवराव जाधव माहिती देताहेत. गरम पाणी पिणे आणि उन्हात बसणे हे कोरोनावरचे रामबाण उपाय असल्याचा दावा देखील ते करताहेत.

त्यांच्याप्रमाणेच विविध माध्यमांतून अनेक लोक नोव्हेल कोरोना व्हायरसवर गरम पाणी, ऊन, ३० डिग्रीपेक्षा जास्तीचे तापमान असे विविध उपाय सुचवताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी दिवे लावायला सांगितले होते त्यावेळी देखील अनेकांनी पंतप्रधानांच्या या अवाहनाला त्यांचा मास्टरस्ट्रोक ठरवत दिव्यांमुळे निर्माण होणारी उर्जा आणि उष्णता कोरोना व्हायरस संपवेल असे दावे केले होते.

Image may contain: possible text that says 'Forwarded Corona viruses don't survive in hot temperature, as per research by NASA. If 130 candles are lit together, temperature will increase by 9 degrees- as per IIT professor. So Corona will die at 9:09pm on Sunday. Masterstroke by Modi. 9:44 AM'

पडताळणी:

या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही जेव्हा शोध घेतला त्यावेळी आम्हाला BBC ची एक बातमी सापडली. त्यामध्ये त्यांनी रॉन एक्लीस या इंग्लडमधील कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या श्वसनयंत्रणेसंबधी रोगांवर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञाशी संवाद साधला होता. रॉन यांनी हेच सांगितलं की गरम पाणी कोरोनावर उपायकारक असल्याचा काहीच पुरावा नाही.

सोबतच आम्ही ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ (WHO) म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर यासंबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कोरोना विषयी गैरसमज आणि अफवांना उत्तरे देण्यात आली आहेत. यात कोरोना उष्णता यासंबंधीच्या गैरसमजांना अनुसरून दोन उत्तरे देण्यात आली आहेत. 

https://www.who.int/images/default-source/health-topics/coronavirus/myth-busters/web-mythbusters/mb-sun-exposure.png?sfvrsn=658ce588_4
https://www.who.int/images/default-source/health-topics/coronavirus/myth-busters/web-mythbusters/mb-hot-bath.png?sfvrsn=f1ebbc_2

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट’च्या पडताळणी मध्ये हे स्पष्ट झाले की गरम पाणी पिण्याने नोव्हेल कोरोनापासून आपला बचाव करता येतो याचे कुठलेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. तसेच उन्हात उभे राहिल्याने किंवा २५ डिग्रीपेक्षा जास्त तापमानात कोरोना व्हायरस मरतो, या गोष्टीला देखील कुठलाही आधार नाही. उष्ण वातावरणात जर कोरोना विषाणू मरत असता तर कुठल्याही उष्णकटीबंधीय देशात कोरोनाचा प्रसार झालाच नसता.  

गरम पाण्याने अंघोळ करण्याने देखील कोरोना व्हायरसपासून सुटका होऊ शकत नाही. कोरोनावर सध्या तरी कुठलाही उपाय उपलब्ध नाही. नियमितपणे व्यवस्थित हात धुणे, डोळ्यांना, नाकाला, तोंडाला हात लावण्याचे टाळणे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अनुसरणे, हेच कोरोनाला अटकाव करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले सर्वात प्रभावी शस्त्र आहे. तेव्हा गरम पाणी, उष्ण तापमान वगैरे गोष्टी तुम्हाला कोरोनापासून वाचवतील अशा आशयाचे दावे साफ खोटे आहेत, हे स्पष्टच आहे. त्यामुळे अशा अफवांना आम्ही ‘चेकपोस्ट’वर अडवत आहोत.

हे ही वाचा- जगातील पहिली कोरोना लस चाचणी केलेल्या महिलेच्या मृत्यूची बातमी खोटी !

More from कोरोनाMore posts in कोरोना »

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा