Press "Enter" to skip to content

नीता अंबानींनी कंगनाला नवीन स्टुडिओच्या बांधकामासाठी २०० कोटी देण्याची घोषणा केलीये?

सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येतोय की बीएमसीसोबतच्या वादात आता खुद्द अंबानी परिवारच अभिनेत्री कंगना रानावतच्या समर्थानात उतरलाय. (nita ambani supports kangana)

अंबानी परिवाराकडून अभिनेत्री कंगना राणावत हिला नवीन स्टुडिओच्या बांधकामासाठी २०० कोटी रुपये मदत म्हणून देणार आहेत. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी यासंबंधीची घोषणा केली असल्याचा दावा केला जातोय.  

Advertisement

समयारा रावत या युजरने सुशांत सिंग राजपूत फेसबुक पेजवर टाकलेल्या पोस्टचा स्क्रिनशॉट इतरही अनेक युजर्सनी आपापल्या फेसबुक वालवर टाकायला सुरुवात केलीये. फेसबुकवर अनेक वेगवेगळ्या पेजेसवरून या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला जातोय.

ट्विटरवर तर थेट पंतप्रधान कार्यालय आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना पोस्टमध्ये टॅग करण्यात आलंय. माफियांच्या तावडीतून चित्रपटसृष्टीच्या मुक्ततेसाठी हिमाचल प्रदेश सरकारने जमीन आणि निधी देण्याची मागणी करण्यात आलीये.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

आम्ही सर्वप्रथम मुख्य प्रवाहातील न्यूज चॅनेल्स आणि न्यूज पेपर्समध्ये यासंबंधीच्या घोषणेची काही बातमी आहे का ते शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु अशा प्रकारची कुठलीही बातमी आमच्या हाती लागली नाही.

आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जाऊन देखील यासंबंधी काही घोषणा करण्यात आली आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा प्रकारचा कुठलाही ठोस पुरावा आम्हाला मिळाला नाही.

दरम्यान आमच्या पडताळणीमध्ये आम्हाला ‘इंडिया टुडे’ची एक बातमी मिळाली. बातमीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील व्हायरल दाव्याचं खंडन केलं असल्याचं समजलं.

हा व्हायरल दावा खोटा असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अधिकाऱ्याने ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले. बीएमसी आणि कंगना या वादानंतर अशा प्रकारची कोणतीही घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजकडून करण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की नीता अंबानी यांनी कंगना राणावत हिला नवीन स्टुडिओ बांधण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या मदतीची (nita ambani supports kangana) घोषणा केल्याचा सोशल मीडियावरील व्हायरल दावा निराधार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून हा दावा नाकारण्यात आला आहे.

हे ही वाचा- ‘अतिक्रमणातल्या मशिदी BMCला दिसत नाहीत’ सांगत फिरवला जातोय मध्यप्रदेशातला फोटो!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा