Press "Enter" to skip to content

जगातील पहिली कोरोना लस चाचणी केलेल्या महिलेच्या मृत्यूची बातमी खोटी !

ऑक्सफर्ड विद्यापीठाने शोधलेल्या कोरोना व्हायरसवरील लसीची मानवी चाचणी करण्यात आली होती. ती चाचणी ज्या महिलेवर केली गेली त्या महिलेच्या मृत्यूची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. महिलेवर कोरोना लस प्रयोग करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Advertisement

मराठीतील नामांकित वृत्तपत्र ‘दै. लोकमत’ने ‘दुखद बातमी: कोरोना व्हायरसवरील लसीची पहिली चाचणी करण्यात आलेल्या स्वयंसेवक महिलेचा मृत्यू’ या मथळ्यासह ही बातमी छापली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मिडीयावर देखील ही बातमी मोठ्या प्रमाणात शेअर केली गेली.  

पडताळणी:

दि. २३ एप्रिल २०२० रोजीपासून ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लसीच्या मानवी शरीरावरील चाचणीस सुरुवात झाली. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. एलिसा ग्रॅनेटो यांच्यावर या लसीचा प्रयोग करण्यात आला आणि त्यांचाच मृत्यू  झाला असल्याची बातमी पसरली.

व्हायरल बातमी क्रॉसचेक करताना आम्ही सर्वप्रथम डॉ. एलिसा ग्रॅनेटो यांचं ट्विटर अकाऊंट तपासून बघितलं. त्यात ट्विट्स तपासण्याची गरजच नाही पडली कारण त्यांनी आपल्या नावासमोरच ठळकपणे १०० टक्के जिवंत असल्याचं लिहून ठेवलंय.

बीबीसी न्यूजचे पत्रकार फर्ग्युस वॉल्श यांनी देखील डॉ. ग्रॅनेटो यांच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचं ट्वीट केलंय. आपल्या ट्वीटमध्ये फर्ग्युस वॉल्श म्हणतात, “ऑक्सफर्डमध्ये सुरु असलेल्या कोरोना लसीच्या मानवी परीक्षणातील स्वयंसेवक महिलेचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी पसरवली जात आहे. मी आज सकाळी डॉ. एलिसा ग्रॅनेटो यांच्याशी स्काईपच्या माध्यमातून संपर्क साधला. त्या जिवंत आहेत आणि त्या अगदी व्यवस्थित असल्याचं देखील त्यांनी मला सांगितलं.”

फर्ग्युस वॉल्श यांनी डॉ. एलिसा ग्रॅनेटो यांच्याशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर केलाय.

वस्तुस्थिती:

चेकपोस्टच्या पडताळणीत डॉ. ग्रॅनेटो यांच्या मृत्यूची बातमी खोटी असल्याचं आढळून आलं आहे. त्या धडधाकट असून शास्त्रज्ञ म्हणून कोरोना लस संशोधनाच्या प्रक्रियेत आपल्यावर सोपविण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडण्यासाठीस आपण तत्पर असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे या अशा अफवांना आम्ही ‘चेकपोस्ट’वर वेळीच थांबवतो आहोत.

हे ही वाचा- गरम पाणी किंवा कडक ऊन कोरोना व्हायरस पासून वाचवू शकत असल्याचे दावे खोटे

More from कोरोनाMore posts in कोरोना »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा