Press "Enter" to skip to content

संजय राऊत यांनी अर्णब गोस्वामीला टोला लगावल्याचे व्हायरल ट्विट फेक!

खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता अर्णब गोस्वामी यांचा (sanjay raut on arnab) तिखट शब्दात समाचार घेतल्याचा दावा करणारं एक ट्विट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात शेअर केलं जातंय.

Advertisement

कंगना राणावत विरुद्ध महाराष्ट्र सरकार हे चित्र उभं राहताना शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी काही वक्तव्ये केली आहेत त्यावर ‘रिपब्लिक टीव्ही’वर भाष्य करताना पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी माझ्या समोर येऊन बोला, मला मुलाखत द्या असे काहीसे आव्हान दिले होते.

याबद्दल संजय राऊत यांनी ठाकरी शैलीतच अर्नबचे नाव न घेता दणदणीत टोला लगावला (sanjay raut on arnab) अशा अविर्भावात एक ट्विटर स्क्रीन शॉट सोशल मीडियात व्हायरल होतोय. प्रख्यात शायर दिवंगत राहत इंदौरी यांच्या ‘लगेगी आग तो आएँगे घर कई जद में’ या शायरीचे विडंबन या ट्वीटमध्ये आहे.

अर्काइव्ह पोस्ट

फेसबुक युजर्स याच ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत असल्याचे आपण ‘येथे‘ आणि ‘येथे‘ पाहू शकता.

पडताळणी:

व्हायरल स्क्रीनशॉट निरखून पाहिला तरी लक्षात येईल की हे ट्वीट फेक आहे. कसे?

१. ‘संजय राऊत’ नव्हे ‘संजय रावत

व्हायरल ट्विट ‘संजय राऊत’ नावाने नव्हे तर ‘संजय रावत’ या नावाने केलेले आहे. स्वतःचे नाव लिहिताना नावात एवढी मोठी चूक खासदार संजय राऊत करण्याची शक्यता नाही. हाच धागा पकडत आम्ही पडताळणीस सुरुवात केली.

२. ब्ल्यू टिक व्हरिफिकेशन मार्क
एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याच्या, बॉलीवुड मधल्या कलावंताच्या, नामांकित लेखक, उद्योजक यांचे व्हेरिफाईड अकाऊंट लोकांना कळावेत यासाठी ‘ब्ल्यू टिक’ मार्क ट्विटरकडून मिळते. तेच एखाद्या फेक अकाउंटला ब्ल्यू टिक मार्क मिळणे शक्य नसते.

sanjay raut verified tweet checkpost marathi
Source: Twitter

इथेही तेच झाले व्हायरल ट्विट ज्या @sanjayrawat07 या ट्विटर हँडलवरून शेअर झालेय त्यास ‘ब्ल्यू टिक’ नाही. या उलट @rautsanjay61 या ट्विटर हँडलवर असलेली प्रोफाईल संजय राऊत यांची अधिकृत प्रोफाईल आहे कारण त्यावर ‘ब्ल्यू टिक’ मार्क आहे.

sanjay raut fake tweet check post marathi
Source: Twitter

३. ट्विटर अकाऊंट ओपन केल्याच्या तारखा

संजय राऊत यांचं अधिकृत अकाऊंट(@rautsanjay61) च प्रोफाईल तपासल्यावर लक्षात येत की हे अकाऊंट डिसेंबर २०१३ पासून सुरु करण्यात आल असून, यात सामानाचे संपादक, राज्यसभा सदस्य,आणि शिवसेना लीडर असल्याचं लिहिलेलं आहे. या अकाऊंटचे एकूण 584 हजार फॉलोवर्स आहेत.

तर याउलट अनधिकृत अकाऊंट(@sanjayrawate07 ) मध्ये त्यांच्या कोणत्याच पदाचा उल्लेख केलेला नाही. आणि ते ‘मे २०२०‘मध्ये ओपन करण्यात आले आहे.

४. सातत्याने प्रक्षोभक ट्विट्स

या फेक ट्विटर अकाऊंटवरून सातत्याने प्रक्षोभक, गदारोळ होईल असे ट्विट करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. जसे की रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर तसेच अर्णब संदर्भातील वाद-विवादाच्या संदर्भाने या अकाउंटवरून करण्यात आलेले ट्विट आपण बघू शकता.

अर्काइव्ह ट्विट

अर्काइव्ह पोस्ट

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की खासदार संजय राउत यांनी पत्रकार अर्नब गोस्वामीना नाव न घेता टोला लगावल्याचे व्हायरल ट्विट फेक आहे. ते राउत यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर झालेले नसून ‘संजय रावत’ या फेक ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहे. या अकाऊंटवरून इतरही अनेक वादग्रस्त ट्विट्स करण्यात येत आहेत.

हेही वाचा: राज ठाकरेंनी कंगनाची बाजू घेत संजय राऊतांना धमकावले नाही, ते ट्विटर हँडल फेक!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा