Press "Enter" to skip to content

‘डॉ. मनमोहन सिंह यांचं हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशात चीन ने उतरू दिलं नव्हतं’ यात किती तथ्य?

‘जिस अरुणाचल प्रदेश में चीनियों ने डॉ. मनमोहन सिंह जी के हेलीकॉप्टर को उतरने नहीं दिया था, वहां अभी ब्रह्मोस मिसाइल तैनात है! यह है ५६ इंच की ताकत!’

Advertisement

अशा वाक्यांच्या ग्राफिक्ससह बनवलेली इमेज मोदीनामा या फेसबुकपेजवर पोस्ट केलेली आहे. तीच नवनाथ वाघुले या फेसबुक युजरने ‘BJP India & Maharashtra’ या ग्रुप मध्ये शेअर केली आहे.

या ईमेजला आतापर्यंत सोळा हजारहून अधिक लोकांनी शेअर केलंय.

सौ बात की एक बात!

Posted by ModiNama on Thursday, 2 July 2020

याच दाव्यांचे शेकडो ट्विट्ससुद्धा उपलब्ध आहेत.

Tweets claiming china stopped Manmohan Singh from landing in Arunachal Pradesh
source: twitter

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’समोर हे दावे आल्यानंतर सर्वात आधी आम्ही गुगलवर विविध कीवर्ड्स टाकून सर्च केलं परंतु अशी एकही बातमी सापडली नाही ज्यात पूर्व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे हेलीकॉप्टर अरुणाचल प्रदेशात उतरण्यापासून चीनने रोखल्याची घटना नमूद केलेली आहे.

मात्र आम्हाला ‘द हिंदू’ची एक बातमी सापडली ज्यामध्ये डॉ. मनमोहन सिंह यांनी अरुणाचल प्रदेशला भेट दिल्याने चीनने नाराजी व्यक्त केल्याचं म्हंटलंय.

३ ऑक्टोबर २००९ रोजी डॉ. सिंह यांनी अरुणाचल प्रदेशला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट दिली होती. या भेटीवर १३ ऑक्टोबर २००९ म्हणजे डॉ. मनमोहन सिंह यांच्या भेटीनंतर तब्बल दहा दिवसांनी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मा झाओक्सू यांनी नाराजी व्यक्त करत ‘हा विवादित भाग असताना तिथे भारतीय नेत्याने भेट दिलीय. आम्ही आशा करतो की सीमा भागात भारताच्या बाजूने काही समस्या उभ्या राहू नयेत ज्यामुळे भारत चीनच्या सुधारित संबंधात काही फरक पडेल.’ यावेळी त्यांनी डॉ. मनमोहन सिंह यांचे नाव घेणे सुद्धा टाळले होते.

दाव्यात सांगितल्याप्रमाणे ब्राह्मोस क्षेपणास्त्राबद्दल सुद्धा आम्ही पडताळणी केली. ‘NDTV’च्या २३ ऑगस्ट २०१६च्या बातमीनुसार भारताने अरुणाचल प्रदेश येथे रशियातून आलेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र अरुणाचल प्रदेशात तैनात करण्यावरून भारत चीन मध्ये पुन्हा काही शाब्दिक चकमक झाली होती त्यावेळी भारतीय सैन्याने ‘its not your business’ म्हणत कडक प्रत्युत्तर दिलं होतं.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये दाव्यात सांगितल्याप्रमाणे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची गोष्ट खरी निघाली असली तरीही डॉ. मनमोहन सिंह यांच्या हेलीकॉप्टरला अरुणाचल प्रदेशात चीन ने उतरू दिले नाही सांगणारा दावा निराधार आणि फेक आढळला.

उलट डॉ. मनमोहन सिंह अरुणाचल प्रदेशात जाऊन माघारी आले आणि मग तब्बल दहा दिवसांनी चीनने त्यावर प्रतिक्रिया दिली होती.

हेही वाचा:‘जग भारताच्या बाजूने’ भासविण्यासाठी भाजप नेते घेताहेत फेक ट्वीटर अकाऊंट्सचा आधार!

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा