Press "Enter" to skip to content

मुस्लीम हॉटेल्समध्ये जेवणातून हिंदूंना नपुंसक बनविण्याच्या गोळ्या खाऊ घातल्या जातायेत? वाचा सत्य!

सोशल मीडियातून अनेक दिवसांपासून एका पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. यामध्ये काही फोटोज आहेत आणि दावा केला जातोय की राजस्थान, गुजरात, महाराष्ट्राच्या हायवेवर असणाऱ्या मुस्लीम हॉटेल्समध्ये (muslim hoteliers) जेवणातून हिंदूंना नपुंसक करण्याच्या गोळ्या खाऊ घातल्या जातायेत.

Advertisement

व्हायरल दावा:

सावधान, सावधान ! मित्रो राजस्थान, गुजरात और महाराष्ट्र के हायवेप्र सभी मुस्लीम हॉटेलोमें हिंदू लोगोंके लिये नपुंसकता की दवाइया खाने मे मिलाते है. मुस्लीम हॉटेलोसे सावधान रहे! ये लोग हिंदूओकी आबादी कम करने के लिये और हिंदूओका धर्म नष्ट करने के लिये नानवेज भी मिलाकर खिलाते है. ऐसे केलीक्ल रासायनोका इस्तेमाल करते है जीससे हमारे सेहत को नुकसान पुहुंचे. राजस्थान से आनेवाली सभी बस वालों को मुस्लीम हॉटेलोपर ठहरने रोके! आगे सावधान रहे.

viral claims about muslim hotels
Source: Whatsapp

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक किरण साळुंखे आणि सुहास देशपांडे यांनी सदर व्हायरल स्क्रिनशॉट निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी विविध कीवर्ड्सच्या आधारे सर्च केले परंतु व्हायरल दावा खरा असल्याचे दर्शवणारी कुठलीही घटना समोर आली नाही. आम्ही त्या दाव्यासोबत असणारा प्रत्येक फोटो गुगल रिव्हर्स सर्च करून पाहिला. समोर आलेली माहिती पुढीलप्रमाणे:

फोटो क्रमांक १:

पडताळणीमध्ये हा फोटो बिजनोर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अपलोड झाल्याचे समजले. त्यावरील माहितीनुसार उत्तरप्रदेशातील बिजनोर पोलिसांनी मदरशावर छापा मारला आणि त्यात अवैध शस्त्रांची तस्करी करणारे ६ जण, १ पिस्तुल, ४ कट्टे आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे ताब्यात घेतले गेले. ११ जुलै २०१९ रोजीचे हे ट्विट आहे.

फोटो क्रमांक २ आणि ३:

डेली मिरर‘ या वृत्तपत्राच्या २ मे २०१९ रोजीच्या बातमीनुसार कोलंबोमध्ये एका बाप लेकाला सुरक्षारक्षकांनी पकडले. ते अवैध औषधांची तस्करी करत होते. पाकिस्तानात तयार झालेली ही औषधे श्रीलंकेतील कोलंबोमध्ये पुरवली जात होती.

Source: Daily Mirror

फोटो क्रमांक ४:

बिर्याणीच्या पातेल्यासोबत असणाऱ्या मुस्लीम व्यक्तीचा हा फोटो ‘Videosmylive – How to Best South Indian Style’ या युट्युब चॅनलवर १ जुलै २०१६ साली अपलोड केलेल्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत राजस्थान, गुजरात, महाराष्ट्राच्या हायवेवर असणाऱ्या मुस्लीम हॉटेल्समध्ये जेवणातून हिंदूंना नपुंसक करण्याच्या गोळ्या खाऊ घातल्या जात असल्याचे व्हायरल दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. दाव्यासोबत व्हायरल होणारे फोटोज जुने आणि भलत्याच घटनांशी संबंधित आहेत.

हेही वाचा: ‘हलाल’ म्हणून मुस्लीम स्वयंपाकी मिसळतात अन्नात थुंकी? उच्च न्यायालयात दिली कबुली?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा