Press "Enter" to skip to content

भाजप विरोधी प्रतिज्ञा घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य आले समोर!

“भारतीय जनता पार्टीको वोट नहीं दुंगा, ना ही भारतीय जनता पार्टीके किसी कार्यकर्ताका कोई सहयोग करुंगा” अशी प्रतिज्ञा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय. (anti BJP vow)

Advertisement

‘कितना बड़ा सडयंत्र हो रहा है देश के खिलाफ वो भी स्कूलों मै। बच्चों के अंदर भी क्या जहर भर रहे है। इस वीडियो को इतना वायरल करो जिससे कि इस स्कूल के प्रिंसिपल पर कार्यवाही होनी चाहिए।’ असा मेसेजही त्या व्हिडीओसोबत व्हायरल होताना दिसतोय.

अर्काइव्ह

‘ट्विटर प्रमाणेच फेसबुकवरही हेच दावे जोरदार व्हायरल होतायेत. यास व्हॉट्सऍपदेखील अपवाद नसल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक कैलास ढवळे, राजेंद्र काळे, निलेश मालानी आणि पुरुषोत्तम शर्मा यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याविषयी पडताळणी करताना काही कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले असता जानेवारी २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या विविध बातम्या आम्हाला मिळाल्या. या बातम्यांनुसार मध्यप्रदेशातील इटारसी येथे असलेल्या विजयलक्ष्मी आयटीआय कॉलेजमधील हा (anti BJP vow) व्हिडीओ आहे.

भाजप विरोधी शपथ घेण्याचे कारण काय?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अर्धवट आहे. ‘झी न्यूज’ने २९ जून २०१८ रोजी युट्युबवर अपलोड केलेल्या बातमीमध्ये संपूर्ण व्हिडीओचा समावेश आहे. यात ‘जबतक भारतीय जनता पार्टी की सरकार ऑनलाईन परीक्षा बंद नहीं कर देती तबतक मै भारतीय जनता पार्टी को वोट नहीं दुंगा’ असे ऐकायला मिळते आहे. परंतु व्हायरल व्हिडीओ ‘ तबतक मै भारतीय जनता पार्टी को वोट नहीं दुंगा’ या वाक्यापासून चालू झाला आहे.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही शपथ घेतली गेल्याचे समजते. आयटीआयमध्ये कॉम्प्युटरची परीक्षा ऑनलाईन ठेवल्याचा रोष व्यक्त करण्यासाठी ही शपथ ग्रहण केली गेलीय. या व्हिडीओनंतर भाजपचे काही नेते कॉलेजमध्ये पोहचले. त्यांचा कॉलेज प्रशासनासोबत वाद झाला. यावेळी प्रशासनाने भाजपची माफी मागितली आणि या व्हिडीओमागे कॉंग्रेसच्या ‘एनएसयुआय’ या विद्यार्थी संघटनेचा हात असल्याचे सांगितले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल होत असलेला (anti BJP vow) व्हिडीओ ३ वर्षे जुना असून तो एडीट केलेला आहे. ऑनलाईन परीक्षेला विरोध करण्यासाठी ही शपथ असल्याचा भाग त्यातून कट केलेला आहे. तसेच कॉलेज प्रशासनानुसार यामागे कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा हात असल्याचे समजते.

हेही वाचा: कोरोनाची लस मोफत उपलब्ध करून देणारा भारत हा एकमेव देश आहे? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा