Press "Enter" to skip to content

प्रधानमंत्री मोदींवर टीका करणारा सैनिक ‘फेक’ असल्याचा दावा करणाऱ्या बातम्याच ‘फेक’!

सोशल मीडियावर एका पंजाबी व्यक्तीचा व्हिडीओ (goldy manepuria army) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून व्हिडिओत सदर व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देश्यून शेतकरी आंदोलनाच्या संदर्भाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

व्हायरल व्हिडिओतील व्यक्तीने आंदोलक शेतकऱ्यांना आणि आपल्यालाही ‘देशद्रोही’ ‘खलिस्थानी’ अशी विशेषणे दिल्याबद्दल ‘गोदी मीडिया’ची मोदींकडे तक्रार केली आहे. शिवाय नरेंद्र मोदींवर देखील अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘नवभारत टाईम्स’च्या वेबसाईटवर एक बातमी प्रकाशित करण्यात आली. बातमीमध्ये दावा करण्यात आला की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती पंजाबी गायक आणि अभिनेता गोल्डी मनेपुरिया आहे. या व्यक्तीने व्हायरल व्हिडिओत भारतीय सैन्याचा पोशाख (goldy manepuria army) परिधान केला असून त्याचा भारतीय सैन्याशी काहीही संबंध नाही.

Source: Nav Bharat Times

उजव्या विचारधारेशी संबंधित ‘ऑप इंडिया’ या वेबसाईटने देखील व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती सैनिक नसल्याचा दावा करणारी बातमी प्रसिद्ध केली.

अर्काइव्ह पोस्ट

ट्विटर आणि फेसबुकवर देखील अनेक युजर्सकडून या बातम्या शेअर करण्यात आल्या आहेत.

पडताळणी :

सर्वप्रथम तर आम्ही गोल्डी मनेपुरिया या किवर्डसह शोध घेतला असता गोल्डी मनेपुरिया हे माजी सैनिक असून सध्या गायक म्हणून परिचित असल्याचे समजले. त्यानंतर आम्हाला ६ जानेवारी रोजी त्यांच्याच फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आलेली एक पोस्ट मिळाली.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये गोल्डी मनेपुरिया यांनी भारतीय सैन्याच्या सेवेतलया दिवसाचे फोटोज अपलोड केले आहेत. फोटोला पंजाबी भाषेत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी माध्यमांचा दावा खोडून काढलाय.

Source: Facebook

‘द लॉजिकल इंडियन’ने थेट गोल्डी मनेपुरिया यांच्याशी संपर्क साधला असता ‘आपलं खरं नाव मनजींदर सिंग असून गोल्डी मनेपुरिया हे आपलं टोपणनाव आहे. आपण २००२-२०१८ या साधारणतः १६ वर्षांच्या काळात भारतीय सैन्याच्या १७५ मेडीयम रेजिमेंटमध्ये कार्यरत होतो’ अशी माहिती मनेपुरिया यांनी दिली आहे.

मनेपुरिया यांनी पुरावा म्हणून आपलं आर्मी कॅन्टीनचं ओळखपत्र देखील दाखवलं.

Source: The Logical Indian

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या व्यक्तीचा भारतीय सैन्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा करणारे रिपोर्ट्स चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत.

व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती माजी सैनिक मनजींदर सिंग उर्फ गोल्डी मनेपुरिया आहेत. गोल्डी गोल्डी मनेपुरिया हे २००२ ते २०१८ या काळात सैन्य सेवेत होते. सध्या ते पंजाबी गायक म्हणून प्रसिद्ध आहेत.

हे ही वाचा- मुस्लीम व्यक्ती शीख बनून शेतकरी आंदोलनात सामील झाले? वाचा व्हायरल फोटोजचे सत्य!   

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा