Press "Enter" to skip to content

दिलीप कुमार यांच्या शेवटच्या क्षणांचा म्हणून आठ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल!

बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. अशातच त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या शेवटच्या क्षणांचा म्हणून एक व्हिडीओ (Dilip Kumar last video) सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Advertisement

व्हिडिओमध्ये दिलीपकुमार हॉस्पिटलच्या बेडवर दिसताहेत, तर त्यांच्या शेजारी त्यांच्या पत्नी सायरा बानो (Saira Banu) उभ्या असलेल्या बघायला मिळताहेत. ई-टाईम्सच्या अधिकृत फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

Source: Facebook

युट्युबवर देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित चॅनेल्सवरून हा व्हिडीओ दिलीप कुमार यांचा शेवटचा व्हिडीओ म्हणून शेअर केला गेलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या रिव्हर्स सर्च केल्या असता आम्हाला खुद्द दिलीप कुमार यांच्याच अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून २२ सप्टेंबर २०१३ रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असल्याचे आढळून आले. म्हणजेच सध्या दिलीप कुमार यांच्या शेवटच्या क्षणांचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडीओ (Dilip Kumar last video) जवळपास आठ वर्षांपूर्वीचा आहे, हे इथेच स्पष्ट होते.

अर्काइव्ह

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलीप कुमार यांनी चाहत्यांना त्यांच्या प्रार्थना आणि प्रेमाबद्दल धन्यवाद दिले होते आणि आपण रुग्णालयात विश्रांती घेत असल्याचे सांगितले होते.

सप्टेंबर २०१३ मध्ये दिलीप कुमार यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या कारणाने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती त्यावेळी डॉ. जलील पारकर यांनी दिली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की दिलीप कुमार यांच्या शेवटच्या क्षणांचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडीओ जवळपास आठ वर्षांपूर्वींचा आहे. दिलीप कुमार यांना २०१३ मध्ये मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा- पायाला साखळदंड जखडलेली रुग्णशय्येवरील वृद्ध व्यक्ती ‘फादर स्टॅन स्वामी’ नाहीत!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा