Press "Enter" to skip to content

केजरीवाल कृषी कायद्यांचे समर्थन करत असल्याचे भासविण्यासाठी संबित पात्रांनी शेअर केला एडिटेड व्हिडीओ !

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलाखतीची एक व्हिडिओ क्लिप ट्विट केलीय. ‘तीनो फार्म बिल्स के लाभ गिनाते हुये.. सर जी’ या कॅप्शनसह शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल हे कृषी कायद्यांचे समर्थन करत असल्याचे (kejriwal support farm bill) भासविण्याचा प्रयत्न केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह लिंक

पात्रा यांचे हे ट्विट जवळपास २० हजार युजर्सकडून रीट्विट केलं गेलंय.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने ही व्हिडिओ क्लिप ज्या मूळ मुलाखतीचा भाग आहे, ती शोधण्याचा प्रयत्न केला. अरविंद केजरीवाल यांची ‘झी पंजाब हरियाणा हिमाचल’ वर मुलाखत घेण्यात आली होती.

मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ १५ जानेवारी २०२१ रोजी झीच्या युट्युब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. तो संपूर्ण व्हिडीओ व्यवस्थित पाहिल्यावर केजरीवाल यांच्या वक्तव्याशी छेडछाड करण्यात आल्याचे लक्षात आले.

व्हिडीओच्या सहाव्या मिनिटाच्या पुढील सलग वक्त्यव्य:

“केंद्र सरकारने और भारतीय जनता पार्टीने अपने सारे बडे बडे नेता मैदान मे उतारे है. इनके सारे बडे मंत्री मुख्यमंत्री मैदान में उतरे, लोगोंको समझाने के लिये की ये बिल किसानोंके फायदे में है. मैने इन सबके भाषण सुने है. उन भाषणोमें क्या केहते है ये? भाषण में केहते है, इस बिलसे आपकी जमीन नहीं जायेगी, आपका MSP नहीं जायेगा, आपकी मंडी नहीं जायेगी येतो था ही, फायदा क्या हुआ? इनका नेता एक भी फायदा नहीं गिना पा रहा.

जब बहोत ज्यादा कुरेदो तो फायदे के नाम पे केहते है, अब किसान अपनी फसल पुरे देश मे कहीं भी बेच सकता है. यही फायदा गीनाते है ना ये? अब किसान को अच्छे दाम मिलेंगे, वो मंडी के बाहर कहीं भी बेच सकता है.

मै केंद्र सरकार से विनम्रता से पूछना चाहता हु की आज पंजाब और हरियाना में मंडी में MSP साडे अठरासो क्विंटल है गेहू की. बिहार में MSP नहीं है, वहा ८०० रुपये मे किसान बेच रहा है. उस ८०० रुपये वाले किसान को बताव मंडी के बाहर पुरे देश में कहा जाकर अपने गेहू बेचे की उसे साडे अठारासो दाम मिले?”

व्हिडीओच्या ९.४७ मिनिटाच्या पुढील सलग वक्त्यव्य:

“किसान जो है वो दो बाते केह रहे है, उनका समाधान किसानोने इसिमे डाला है. इसी लिये मुझे इस किसान आंदोलन से बहोत बडी उम्मीद है. की एक तो ये तीनो किसान बिल वापस हो, और दुसरा MSP का जो वो मांग कर रहे है की MSP की गारंटी का कानून लाया जाय. MSP स्वामिनाथन आयोग के हिसाब से, जितनी कॉस्ट है उसमें ५०% मिलाके किमत तय की जाय.

अगर ये आ गया, दिलीप जी ये सत्तर सालके अंदर सबसे बडा क्रांतिकारी कदम होगा कृषी क्षेत्र में. किसान कोई भिक नहीं मांग रहा, किसान केह रहा है मुझे अपने फसल का पुरा दाम चाहिये.”

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की केजरीवाल कृषी कायद्यांचे समर्थन करत असल्याचे (kejriwal support farm bill) दावे चुकीचे आहेत. संबित पात्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ एडीटेड आहे.

भाजप आणि केंद्र सरकारमधील नेत्यांच्या वक्तव्यांवर टीका करण्यासाठी वापरलेल्या वाक्यांना तोडून मोडून केंद्र सरकारच्या, भाजपच्या फायद्याचे वक्तव्य केजरीवालांच्या तोंडी देण्याचा प्रयत्न केला गेलाय.

ट्विटरने या गोष्टीची दखल घेऊन व्हिडिओवर ‘Manipulated Media’ म्हणजेच छेडछाड केलेला व्हिडीओ म्हणून लाल अक्षरात सूचना दिलीय.

हेही वाचा: संबित पात्रा यांची मुलगी मुस्लीम मुलासोबत फरार झाल्याने ‘लव्ह जिहाद’ कायद्यान्वये आरोपी?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा