Press "Enter" to skip to content

उद्धव ठाकरे यांचा रिपब्लिक चॅनेल बघतानाचा एडिटेड फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल!

सोशल मीडियावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतंय. मुख्यमंत्री ठाकरे यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोत उद्धव ठाकरे एका रूममध्ये टीव्ही बघताना दिसताहेत. त्यांच्या समोरील टीव्हीवर ‘रिपब्लिक इंडिया’ न्यूज चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांच्या चर्चेचा कार्यक्रम सुरु (uddhav thackeray watching republic) असल्याचे दिसते आहे. अनेक युजर्स मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवताना उद्धव यांना देखील रिपब्लिक टीव्ही बघण्यासाठी ५०० रुपये देण्यात आल्याचा दावा करताहेत.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

सदरील फोटोच्या खरेपणाची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो फोटो रिव्हर्स सर्च टूलच्या मदतीने शोधला. त्यावेळी आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरून दि. २७ एप्रिल २०२० रोजी अपलोड करण्यात आलेले काही फोटोज मिळाले. सध्या अर्णब यांच्या चर्चेचा कार्यक्रम बघतानाचा (uddhav thackeray watching republic) म्हणून व्हायरल होत असलेला फोटो देखील यात मिळाला. फरक फक्त इतकाच की मूळ फोटोत मुख्यमंत्र्यांच्या समोरील टीव्हीच्या स्क्रिनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसताहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्विटच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी काय कृती कार्यक्रम हाती घेतला पाहिजे याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

आम्हाला २७ एप्रिल रोजीच्या ‘दै.लोकसत्ता’ मध्ये प्रकाशित ‘पंतप्रधान मोदींनी दिल्या मुख्यमंत्र्यांना सूचना; ‘या’ जिल्ह्यातील लॉकडाउन हटणार’ या हेडलाईनखाली प्रकाशित बातमी देखील सापडली. या बातमीत देखील हाच फोटो वापरण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन लॉकडाउन उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना केल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे.

याच फोटोशी छेडछाड करून त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोऐवजी रिपब्लिक टीव्हीच्या डिबेटची स्क्रिन जोडण्यात आली आहे.

Source: Twitter

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की उद्धव ठाकरे यांचा व्हायरल फोटो एडिटेड आहे. उद्धव यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतानाचा फोटो एडिट करण्यात येऊन त्याठिकाणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांच्या डिबेटचा फोटो जोडण्यात आला आहे. हा फोटो चुकीच्या शेरेबाजीसह व्हायरल करण्यात येतोय.

हे ही वाचा- महाराष्ट्रात ४७ ‘हाथरस’ म्हणत उद्धव ठाकरेंना ट्रोल करणाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा