सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोत नरेंद्र मोदी हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांच्यासमोर झुकून त्यांना अभिवादन करताना दिसताहेत.
“गुलामों और चमचों के झुके हुए सिर मालिकों के घर का पत्ता बता देते हैं.” अशा कॅप्शनसह सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय.
फेसबुकवर देखील हा फोटो याच कॉपीपेस्ट दाव्यांसह प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल फोटो नेमका कधीचा आणि कुठचा आहे, हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला ‘वन इंडिया’ पोर्टलवर एक बातमी मिळाली. या बातमीमध्ये हाच फोटो वापरण्यात आला असल्याचे बघायला मिळाले. मात्र फोटोत नरेंद्र मोदी ज्यांना अभिवादन करताहेत, त्या नीता अंबानी नसून दीपिका मोंडल असल्याची माहिती मिळाली.
कोण आहेत दीपिका मोंडल?
‘वन इंडिया’च्या बातमीनुसार दीपिका दिव्य ज्योती सांस्कृतिक संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. दीपिका 2003 पासून त्या संस्थेत कार्यरत आहे. सध्या व्हायरल होत असलेला फोटो 2015 मधील आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदी दिव्य ज्योती सांस्कृतिक संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.
‘दिव्य मराठी’ने देखील यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीनुसार दिव्य ज्योती सांस्कृतिक संस्थेचे प्रमुख कार्य संस्कृती, शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, आदिवासींचा विकास यासंबंधीचे आहे. या एनजीओचे काम दिल्ली, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये चालते. त्यांचा मुख्य उद्देश भारतीय कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणे आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटोचा आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा काहीही संबंध नाही.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दीपिका मोंडल यांच्या सोबतचा फोटो एडिट करण्यात आला असून दीपिका यांच्या ठिकाणी नीता अंबानी यांचा चेहरा जोडण्यात आला आहे. दीपिका मोंडल या दिव्य ज्योती सांस्कृतिक संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
हे ही वाचा- व्हायरल व्हिडिओत पंतप्रधान मोदींवर टीका करणारी महिला भाजप नेत्या मनेका गांधी नाहीत!
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]