मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. अन्सारी आणि डॉ. लिमये (Dr Ansari and Dr Limaye) यांच्या दाखल्याने कोव्हीड१९ पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काय घरगुती उपाय करावेत याचे मेसेज व्हायरल होत आहेत.
फेसबुक, व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियातून मेसेंजर मधून हे मेसेज आहे असेच पुढे ढकलले जात आहेत.
हेच मेसेज इंग्रजीतून सुद्धा फिरत आहेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने आजवर कोरोनाविषयक जेवढे फॅक्टचेक केले आहेत, त्या अनुभवानुसार कोरोनावर गरम पाण्याच्या वाफेचा काही परिणाम होतो की नाही याबद्दल मागेच पडताळणी करून झालेली आहे. ती आपण ‘येथे
त्याचप्रमाणे गरम पाण्याने अंघोळ करून अथवा पाणी पिऊन घशाला जरा आराम मिळेल पण त्याने कोरोना विषाणूला कितपत फरक पडेल याबद्दल सुद्धा पडताळणी करून झालीय. ती आपण ‘येथे‘ वाचू शकता.
यावरून हा व्हायरल मेसेज जेव्हा समोर आला तेव्हाच मनात शंका आली आणि आम्ही याची उलटतपासणी करण्यास सुरुवात केली.
नानावटी हॉस्पिटलमध्ये डॉ. अन्सारी आणि डॉ. लिमये (Dr Ansari and Dr Limaye) हे डॉक्टर खरेच आहेत का याबद्दल आधी शोधाशोध केली. नानावटी हॉस्पिटलच्या वेबसाईट वरच डॉ. अब्दुल समाद अन्सारी आणि डॉ. हर्षद लिमये हे दोन्ही डॉक्टर मोठ्या पदांवर असल्याचे दिसले.
डॉक्टर्सची नावे तर खरी आहेत पण त्यांनी दिलेल्या सल्ल्यांत किती तथ्य आहे यासाठी पुन्हा शोध चालू झाला. ट्विटरच्या ऍडव्हान्स सर्चमध्ये आम्हाला एक ट्विट सापडले.
फैझ नावाच्या ट्विटर युजरने हा व्हायरल मेसेज ट्विट करत नानावटी हॉस्पिटलच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग केले आहे आणि सत्यतेबाबत विचारणा केलीय.
यावर नानावटी हॉस्पिटलने ‘व्हिटामिन C प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी किंवा इन्फेक्शनवर मात करण्यासाठी कामी येत असले तरी हे सर्व नुस्खे आमच्या डॉक्टर्सने कोरोना व्हायरस इन्फेक्शन झालेल्या पेशंट्ससाठी उपाय म्हणून कधीही सुचवलेले नाहीत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावा.’ असे उत्तर दिले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये नानावटी हॉस्पिटलच्या डॉ. अन्सारी आणि डॉ. लिमये (Dr Ansari and Dr Limaye) यांनी हे असे सल्ले कधी दिलेच नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
यामधील उपाय आयुर्वेदाला धरून सुद्धा नाहीत कारण आयुर्वेद व्यक्तीपरत्वे औषधांची, पदार्थाची मात्रा बदलत असते.एकच मात्रा सर्वांना लागू होत नाही.
असे उपाय स्वतःहून करून घेण्याने कोरोना रोखता येणार नाहीच पण ईतर आरोग्यविषयक तक्रारींना तोंड देत बसावे लागेल.
हेही वाचा: ‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच झाला कोरोना’ म्हणत ‘सकाळ’ने दिली फेक बातमी!
Be First to Comment