Press "Enter" to skip to content

व्हायरल व्हिडिओमध्ये मौलाना अन्नावर थुंकत आहे का? वाचा सत्य!

भाजपचे प्रवक्ते गौरव गोयल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ ट्विट केलाय. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी दावा केलाय की व्हिडिओत दिसणारी व्यक्ती अन्नामध्ये थुंकत आहे.

Advertisement

अर्काइव्ह

दिल्ली भाजपचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी देखील ‘इस्लाम’ अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ पोस्ट केलाय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित बघितला असता असे लक्षात येईल की व्हिडिओत दिसणारी व्यक्ती अन्नावर थुंकत नाही, तर फुंकत आहे. अल्ट न्यूजच्या रिपोर्टनुसार व्हिडिओत अन्नावर फुंकर मारणारी व्यक्ती काज़ी फ़ज़ल कोयम्मा तंगल आहे. केरळमधील ताजुल उलेमा दर्ग्यामध्ये ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या उर्सच्या निमित्ताने लंगरचे आयोजन करण्यात आले होते. याच लंगरमधील हा व्हिडीओ आहे.

ताजुल उलेमा केरळमधील सुन्नी मुस्लिम विद्वान होते, त्यांचे पूर्ण नाव असय्यद अब्दुल रहमान अल-बुखारी होते. त्यांच्याच नावावर ताजुल उलेमा दर्ग्याचे नाव आहे. ताजुल उलेमा हे व्हिडिओमध्ये अन्नावर फुंकर मारणाऱ्या काज़ी फ़ज़ल कोयम्मा तंगल यांचे वडील होते.

काजी फ़ज़ल कोयम्मा तंगल अन्नावर फुंकर का मारताहेत?

हाजी हनीफ उल्लाह यांनी अल्ट न्यूजला दिलेल्या माहितीनुसार पारंपारिक रिवाज म्हणून जेवण तयार झाल्यावर कुराणच्या आयतींचे पठण करून अन्नावर फुंकर मारली जाते. दुपारी आणि रात्रीचे जेवण तयार झाल्यानंतर दोन्ही वेळेस या प्रथेचे पालन केले जाते.

हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याचे निजामी, पीरजादा अल्तमाश सांगतात की आयुष्यात बरकत (समृद्धी) नांदण्याच्या उद्देश्याने या प्रथेचे पालन केले जाते. हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यामध्ये ही प्रथा पाळली जात नाही. मात्र काही संप्रदायामध्ये या प्रथेचे पालन केले जाते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान कोरोनाच्या प्रसारासाठी मुस्लिम तरुणांचा एक गट भांडी चाटत असल्याचे दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी देखील आम्ही या व्हिडीओ संदर्भातील सत्य बाहेर आणले होते.

व्हिडिओतील तरुण दाऊदी बोहरा समाजाचे असल्याचे समोर आले होते. हे तरुण स्वच्छ भांडी चाटत नव्हते तर जेवण केलेली खरकटी भांडी धुण्याआधी त्यातील सगळे अन्न खात होते. जेवल्यानंतर भांडी चाटून साफ करणं ही एक या संप्रदायातील धार्मिक विधी आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओसोबत करण्यात आलेले दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडिओत दिसणारी व्यक्ती अन्नावर थुंकत नसून अन्नावर फुंकर मारत आहे. आयुष्यात समृद्धी राहण्याच्या उद्देश्याने मुस्लिम समुदायातील काही संप्रदायांमध्ये अशा अन्न शिजून तयार झाल्यानंतर त्यावर फुंकर मारण्याची प्रथा आहे.

हेही वाचा- शिवसेनेचं हिंदुत्व झालं हिरवं? टिपू सुलतान जयंतीच्या पोस्टरवर बाळासाहेबांच्या खांद्यावरील शालही हिरवी?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा