पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची पंजाब सरकारने सुरक्षा काढून घेतली आणि लागलीच त्यावर हल्ला झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनेमागे पंजाबच्या आप सरकारचा हात असल्याचे विरोधकांकडून बोलले जातेय. कॅनडा येथील गँगस्टर गोल्डी ब्रार (Goldy Brar) याने खुनाची जबाबदारी घेतल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यासह गोल्डी ब्रारचा फोटो व्हायरल होतोय.
गोल्डी ब्रारने भगवंत मान मुख्यमंत्री झाल्यानंतर मान यांच्यासह स्वतःचा फोटो ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या. हेच ट्विट शेअर करत आपवर खुणाचे खापर फोडले जातेय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी गोल्डी ब्रारच्या ट्विटची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान असे समजले की या फोटोतील व्यक्ती गोल्डी ब्रार असला तरीही, तो गँगस्टर गोल्डी ब्रार नाही. यासंबंधी त्याने स्वतः स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
“माझे नाव गोल्डी ब्रार आहे. मी जांडवाला गाव, तालुका जलालाबाद, जिल्हा फाजिलखदा येथे राहण्यास आहे. राजिंदर सिंग यांचा मी मुलगा आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या आजच्या दु:खद घटनेत माझ्या छायाचित्राचा सोशल मीडियावर गैरवापर होत आहे. मी त्या लोकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करेन,” अशा प्रकारचे वक्तव्य असणारा व्हिडीओ त्याने शेअर केलाय.
गँगस्टर गोल्डी ब्रार आणि या गोल्डी ब्रारच्या केवळ नावात साधर्म्य आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारविषयी इंडिया टुडेने केलेल्या बातमीत आपण त्याचे छायाचित्र पाहू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गायक सिधू मुसेवालाच्या खुनाचा आरोप करण्याकरिता वापरला गेलेला फोटो गँगस्टर गोल्डी ब्रारचा नसून गोल्डी ब्रार असे नाव असणाऱ्या पंजाब मधील भलत्याच युवकाचा आहे. याचाच अर्थ व्हायरल दावे फेक आहेत.
हेही वाचा: दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने ‘फक्त’ मुस्लिम विद्यार्थ्यांची फीस परत करण्याचे आदेश दिलेत? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]