Press "Enter" to skip to content

कॅडबरी चॉकलेट्समध्ये गोमांसापासून बनवलेले जिलेटीन वापरत असल्याची कंपनीची कबुली? वाचा सत्य!

‘डेअरी मिल्क’ (Dairy Milk) या लोकप्रिय चॉकलेटची कंपनी ‘कॅडबरी’च्या (Cadbury) वेबसाईटवर त्यांच्या उत्पादनांत वापरण्यात आलेले जिलेटीन बीफ (Gelatin Beef) गोमांसापासून बनवले असल्याचे स्पष्ट केल्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

‘कॅडबरी कंपनीने यह स्वीकार किया है की उसके सारे उत्पादो में, हलाल प्रमाणित बीफ (गौ माता का मांस) है. अब आपकी इच्छा हो तो जरूर खाये!’ अ

Advertisement
शा मजकुरासह वेबसाईटचा स्क्रिनशॉट व्हायरल होतोय.

Source: Cadbury

ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सऍप या माध्यमांत हे दावे मागील काही दिवसांपासून जोरदार व्हायरल होत आहेत. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शशिकांत कोचीकर यांनी हे दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल स्क्रिनशॉटचे बारकाईने निरीक्षण केले असता ‘cadbury.com.au/product/halal’ अशा वेबलिंकवरून हा स्क्रिनशॉट घेतल्याचे दिसले. त्याच लिंकवर जाऊन पाहिले असता त्यावरील मजकूर काहीसा वेगळा दिसला.

यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की ‘आमच्या ऑस्ट्रेलियामधील कुठल्या प्रोडक्टमध्ये जर जिलेटीनचा समावेश असेल तर ते हलाल प्रमाणित बीफच्या मांसापासून बनवलेले आहे.’ हे स्पष्टीकरण केवळ ऑस्ट्रेलिया देशापुरते मर्यादित आहे.

Source: Cadbury.com.au

कॅडबरीच्या भारतीय उत्पादनांत बीफ आहे का?

वरील स्पष्टीकरण जसे ऑस्ट्रेलियाबाबत आहे तसे भारताविषयी काही स्पष्ट केले आहे का? हे तपासत असताना असे लक्षात आले की

‘कॅडबरी डेअरी मिल्क’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देण्यात आले होते. यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की व्हायरल स्क्रिनशॉट मधील स्पष्टीकरण भारतासाठी उत्पादित करण्यात येणाऱ्या मोंडेलेज उत्पादनांविषयीचे नाही. भारतात तयार केलेली आणि विक्रीला असलेली सर्व उत्पादने १०० टक्के शाकाहारी आहेत. उत्पादनांच्या आवरणावर हिरवा ठिपका तेच दर्शविण्यासाठी आहे.’

मुख्य प्रवाहातील माध्यमांनी देखील यासंदर्भातील बातम्या छापल्या होत्या. ‘लाईव्ह मिंट’च्या वेबसाईटवरील यासंदर्भातील बातमी आपण बघू शकता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की कॅडबरी कंपनीच्या ऑस्ट्रेलियन वेबसाईटचा स्क्रीनशॉट वापरून भारतीय ग्राहकांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. कॅडबरीच्या उत्पादनांत गोमांस असल्याचे दावे दिशाभूल करणारे आहेत. व्हायरल स्क्रिनशॉटचा भारतीय ग्राहकांशी काहीएक संबंध नाही.

हेही वाचा: राणीच्या बागेचे नाव आता ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे बदलण्यात आल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा