Press "Enter" to skip to content

अखिलेश यादव यांनी राम मंदिर बांधण्याच्या विरोधात ट्वीट केलंय?

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नावे एका ट्वीटचा स्कीनशॉट व्हायरल होतोय. ट्वीटमध्ये दावा करण्यात आलाय की ‘आम्ही (समजवादी पक्ष) सत्तेत असतो तर, मी नेताजींच्या पावलावर पाऊल टाकलं असतं. कितीही लोकं मारली गेली, तरी राम मंदिर (Ram Mandir) कधीच बनू दिलं नसतं’

Advertisement
Credit-Twitter

याच स्क्रीनशॉटच्या आधारे अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्यावर मुस्लीम अनुनयाचा आरोप करण्यात येतोय. अनेक युजर्सनी तर दोघांनाही शिव्यांची लाखोली वाहिलीये.

हाच स्क्रीनशॉट फेसबुकवर देखील शेअर करण्यात येतोय.

Credit- Facebook

पडताळणी :

स्कीनशॉटमधील तारखेनुसार अखिलेश यादव यांच्या अकाऊंटवरून ३ नोव्हेंबर २०२९ रोजी हे ट्वीट करण्यात आलंय. तारखेवरून असं सुचविण्याचा प्रयत्न केला जातोय की अखिलेश यांनी  आयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच्या आठवडाभरापूर्वी हे ट्वीट केलं होतं.

ट्वीटरमधील मुलायमसिंह यादव यांचा संदर्भ ३० ऑक्टोबर १९९० रोजीच्या घटनेशी आहे. त्यावेळी अखिलेश यांचे पिता आणि उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांवर गोळ्या चालवायचा आदेश दिला होता.

अखिलेश यादव यांच्या अकाऊंटवरून खरंच असं काही ट्वीट करण्यात आलाय का हे शोधण्यासाठी आम्ही ट्विटरच्या एडव्हांस सर्चच्या मदतीने अखिलेश यांचं ३ नोव्हेंबर २०१९ रोजीचं ट्वीट शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला अखिलेश यांच्या अकाऊंटवर अशा प्रकारचं कुठलंही ट्वीट मिळालं नाही.

त्यानंतर आम्ही एडव्हांस सर्चच्याच मदतीने आयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अखिलेश यांनी ट्वीटरवर नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती, ते शोधलं. त्यावेळी आम्हाला अखिलेश यांचं ९ नोव्हेंबर रोजीचं ट्वीट मिळालं.

सर्वोच्च न्यायालयाने याच दिवशी ऐतिहासिक अयोध्या प्रकरणावर आपला निकाल दिला होता.

९ नोव्हेंबर रोजीच्या ट्वीटमध्ये अखिलेश म्हणताहेत,

“ज्या निर्णयांमुळे माणसामाणसांतील भेद मिटतात, ते माणसाला अधिक समृद्ध बनवतात”

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राम मंदिराच्या निर्मितीच्या विरोधात कुठलंही ट्वीट अथवा वक्तव्य केलेलं नाही.

सोशल मिडीयावर त्यांच्या नावाने पसरविण्यात येत असलेला स्क्रीनशॉट फेक आहे. फोटोशॉप किंवा अन्य तत्सम एडिटिंग ऐपच्या सहाय्याने तो बनविण्यात आला आहे.   

हे ही वाचा- राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघातील रस्ता म्हणत व्हायरल होतोय खड्डेयुक्त बिहारचा रस्ता!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा