Press "Enter" to skip to content

इराकमध्ये वाहतेय वाळूची नदी? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य!

‘इराकमध्ये वाळूची नदी वाहते, आतापर्यंत फक्त ऐकले होते, परंतु व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटले. निसर्गाच्या खेळाचे आश्चर्यकारक दृश्य .’ अशा कॅप्शनसह १.२८ मिनिटाचा व्हिडीओ सोशलमीडियात व्हायरल होतोय.

Advertisement
Archive

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रल्हाद मिस्त्री आणि राजेंद्र गवस यांनी सदर व्हायरल दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांशी संबंधित कीवर्ड्सच्या आधारे गुगल सर्च केले. यामध्ये ‘आयएफएल सायन्स’ या वेबसाईटवर अशी माहिती मिळाली की ही वाळू नसून ‘हेल स्टोन्स’ (Hailstone)आहेत. नोव्हेंबर २०१५ मधील ईराकच्या वाळवंटातलं हे दृश्य आहे.

हे ‘हेल स्टोन’ म्हणजे नेमकं काय हे समजून घेत असताना ‘नॅशनल जिओग्राफिक‘ चॅनलच्या वेबसाईटवर असे समजले की पाण्याच्या ढगांवर वादळाचा उलटा तडाखा बसल्यावर गोठलेले पाण्याचे गोळे पुन्हा ढगात ढकलले जातात. त्यावेळी त्या गोळ्यांवर पुन्हा पाण्याचा थर जमा होऊन गोठतो. त्याचे आकारमान आणि वजन एवढे वाढते की ते गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीवर झेपावतात. आपण यांना गारा म्हणतो.

ईराकमध्ये २०१५ साली अशी परिस्थिती ओढवली होती की गोल्फ बॉलच्या आकाराएवढे हे गोळे जमिनीवर पडत होते. यामुळे अगदी आणीबाणी लागू करण्या इतकी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. हेच असंख्य गोळे आणि पाणी वाहून चालले असताना वाळूच्या नदीचा भास होत होता.

व्हायरल व्हिडीओच्या १.४ मिनिटाला व्हिडीओ बनवणाऱ्याने कॅमेरा बराच जवळ नेला आहे. नंतर तर ते गोळे हातात देखील घेतले आहेत. त्यातून सहज लक्षात येते की ही वाळू नसून बर्फासारखे गोळे आहेत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की ईराक मध्ये वाळूची नदी वाहतेय असे सांगत व्हायरल होणारे दावे फेक आहेत. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती वाळू नसून गारांसारखे ‘हेल स्टोन्स’ आहेत. असंख्य बर्फाचे गोळे एकाचवेळी वाहून येत असल्याने नदीसारखे भासत आहे.

हेही वाचा: ‘त्या’ किड्यास हाताने माराल तर शरीराची होईल भयानक अवस्था? वाचा व्हायरल मेसेजचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा