Press "Enter" to skip to content

ABP न्यूजच्या फेक ग्राफिक्सच्या आधारे राहुल गांधींना पाकिस्तान धार्जिणे ठरविण्याचा खोडसाळ प्रयत्न!

सोशल मीडियावर ABP न्यूजची (ABP News) अनेक वेगवेगळी ग्राफिक्स व्हायरल होताहेत. या ग्राफिक्सनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पाकिस्तानला मदत करण्याचे, आपण हिंदू नसून केवळ वोट बँकेसाठी हिंदू बनलो असल्याचे सांगितल्याचे दावे केले जाताहेत. राहुल गांधींच्या नावे इतरही विधाने व्हायरल केली जाताहेत.

Advertisement

राहुल गांधींनी खालील विधाने केली असल्याचे दावे करणारे ABP न्यूजचे ग्राफिक्स सोशल मीडियावर व्हायरल आहेत.

मेरे पूर्वज मुस्लिम थे मैं मुसलमान हूँ.”

हमारी सरकार बनते ही पाकिस्तान को 5 हजार करोड़ कर्ज देंगे बिना ब्याज 50 साल के लिए.

कोंग्रेस मुस्लिमों की है और उनकी ही रहेगी.”

पाकिस्तान की मदद करना जरूरी है और हम यह जरूर करेंगे.”

Viral ABP News Graphics about Rahul Gandhi check post marathi
Source: Facebook

पडताळणी:

  • राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पाकिस्तान धार्जिणे, हिंदुविरोधी अशी प्रतिमा रंगवण्यासाठी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून अशा प्रकारची वक्तव्ये व्हायरल केली जाताहेत. ABP न्यूजने (ABP News) २०१८ मध्येच यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेले आहे.
  • आपल्या चॅनेलच्या टेम्प्लेट्सच्या आधारे व्हायरल करण्यात आलेली ही वक्तव्ये एडिटेड असून ABP न्यूजने अशी कुठलीही बातमी दिलेली नाही. या टेम्प्लेट्सशी ABP न्यूज किंवा ABP समूहाचा काहीही संबंध नाही, असे ABP न्यूजकडून सांगण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कुठलेही हिंदु विरोधी किंवा पाकिस्तानच्या समर्थनातील विधान केलेले नाही. ABP न्यूजच्या फेक ग्राफिकच्या आधारे राहुल गांधींना पाकिस्तान धार्जिणे आणि हिंदुविरोधी ठरविण्याचा खोडसाळपणा केला जातोय. खुद्द ABP न्यूजनेच हे ग्राफिक्स एडिटेड असल्याचे सांगताना त्यांच्याशी ABP समूहाचा कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा-  राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी आजवर डागलेल्या ‘फेक’ तोफा !

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा