सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ भावनिक झाल्याचे बघायला मिळताहेत. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला फैज अहमद फैज यांची ‘हम देखेंगे’ ही कविता ऐकायला मिळतेय. दावा केला जातोय की ‘द काश्मीर फाइल्स’ (The kashmir files) बघून योगी आदित्यनाथ इतके भावनिक झाले की त्यांना अश्रू अनावर झाले.
फेसबुकवर देखील हा व्हिडीओ अशाच प्रकारच्या दाव्यांसह मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला एबीपी न्यूजच्या युट्यूब चॅनेलवरून 17 ऑक्टोबर 2017 रोजी अपलोड करण्यात आलेली बातमी बघायला मिळाली.
एबीपी न्यूजच्या बातमीनुसार योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीनिमित्त आयोजित ‘एक दिया शहीदों के नाम’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बॉर्डर चित्रपटातील ‘संदेसे आते है’ हे गाणे ऐकून योगी आदित्यनाथ यांना रडू आवरले नाही.
‘झी न्यूज’च्या युटयूब चॅनेलवरून देखील 20 ऑक्टोबर 2017 रोजी यासंदर्भातील बातमी देण्यात आली होती. बातमीनुसार गोरखनाथ मंदिरात शहिदांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात शहिदांच्या सन्मानार्थ 11 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की व्हायरल योगी आदित्यनाथ यांच्या व्हायरल व्हिडिओचा ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. व्हिडीओ साधारणतः 4 वर्षांपूर्वीचा असून शहिदांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील आहे.
हेही वाचा- ‘द काश्मीर फाइल्स’ पाहून लालकृष्ण अडवाणींना रडू कोसळल्याचे दावे फेक! वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment