‘काला धन लाने वाले, काले धन के मालिक बन बैठे’ या कॅप्शनसह मोहन भागवत, अमित शहा, जेटली, पासवान यांसारख्या २४ नेत्यांचे स्विस बँकेत (swiss bank) काळे धन असल्याच्या बातमीचे कात्रण सोशल मीडियात व्हायरल होत आहे. विकिलिक्सने (wikileaks) ही यादी जाहीर केली असल्याचा दावा केला जातोय.
एनकेन प्रकारे भाजपशी संबंधित असणाऱ्या तब्बल २४ दिग्गज नेते आणि उद्योगपतींच्या नावाचा समावेश असणारी यादी ‘विकीलीक्स’ने जाहीर केली असून या सर्वांची स्विस बँकेत असणारी रक्कम देखील जाहीर झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चेकपोस्ट मराठी’चे वाचक रुपेश पोळ यांनी फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवर देखील हे दावे फॉरवर्ड केले जात असल्याचे ‘निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी ऍडव्हान्स्ड की-वर्ड सर्च केल्यानंतर सदर दावे २०१७ सालापासून व्हायरल होत असल्याचे लक्षात आले.
अशाच प्रकारे कॉंग्रेस पक्षाशी संबंधित असणाऱ्या २४ लोकांच्या नावाची यादी विकीलीक्सने जाहीर केल्याचे दावे देखील व्हायरल होत होते. या यादीमध्ये सर्वात जास्त काळे धन असल्याचे दाखवत सोनिया गांधी यांचे नाव सर्वात वरती होते.
या अशा विविध नेत्यांच्या याद्या सातत्याने अनेक वर्षांपासून व्हायरल होत आहेत. अशा दाव्यांच्या मुळाशी जात सत्यतेची पडताळणी करताना ‘चेकपोस्ट मराठी’ला २०११ सालचे विकीलीक्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील ट्विट सापडले. यामध्ये विकीलीक्सने स्विस बँकेत (wikileaks india swiss bank) काळे धन असणाऱ्या भारतीयांची अशा प्रकारची कुठलीही यादी प्रसिद्ध केली नसून ही यादी फेक असल्याचे स्पष्ट केले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावा फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस किंवा भाजप दोन्ही पक्षांशी संबंधित नेत्यांची स्विस बँकेत मालमत्ता असल्याच्या याद्या विकीलीक्सने आजवर जाहीर केल्या नाहीत.
हे ही वाचा: विकिलिक्सने राहुल गांधी विवाहित असल्याचा खुलासा केलाय?
[…] हेही वाचा: मोहन भागवत, अमित शहा यांसारख्या बड्या … […]