Press "Enter" to skip to content

पितृ पक्षातील अमावस्येला प्रकट झालेली नदी दिवाळी अमावस्येला अदृश्य होते?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये वाहते पाणी बघायला मिळतेय. व्हायरल व्हिडीओ सोबत दावा केला जातोय की दक्षिण भारतातील ही नदी पितृ पक्षातील अमावास्येला प्रकट होते आणि दिवाळी अमावास्येला अदृश्य होते. फक्त एक महिना ही नदी दृश्य असते नंतर पुन्हा प्रकृतीत विलीन होऊन जाते. हा निसर्गाचा विलक्षण चमत्कार असल्याचे सांगितले जातेय.

Advertisement
Source: Facebook

ट्विटरवर देखील साधारणतः अशाच प्रकारचे दावे हिंदीतून व्हायरल होताहेत.

अर्काइव्ह

पडताळणी:

आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला हाच व्हिडीओ १९ सप्टेंबर २०१७ रोजी युट्यूबवर अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले. कावेरी नदीच्या पाण्याचा तमिळनाडूतील मायावरममध्ये प्रवेश अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

या माहितीच्या आधारे किवर्ड सर्च केलं असता ‘द हिंदू’चा १९ सप्टेंबर २०१७ रोजीचा रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टमध्ये घटनेची सविस्तर माहिती वाचायला मिळते. रिपोर्टनुसार कर्नाटक सरकारने मेट्टूर धरणात (Mettur Dam) कावेरी नदीचे पाणी सोडले होते. पाणी खूप जास्त असल्याने पाण्याचा वेग देखील जास्त होता. नदीच्या पाण्याची पूजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक जमले होते. तामिळनाडूमधील महापुष्करम कार्यक्रमासाठी (Maha Pushkaram festival) मेत्तूर धरणात सोडण्यात आले होते.

Source: The Hindu

महापुष्करम कार्यक्रम काय आहे?

पुष्करम समारंभात नद्यांची पूजा केली जाते. २०१७ साली जवळपास १४४ वर्षानंतर तामिळनाडूतील मयिलादुथुरई येथे कावेरी महापुष्करम साजरा करण्यात आला होता. हा उत्सव साजरा करण्यासाठी तेथील पुजाऱ्यांनी सरकारकडे कावेरी नदीचे पाणी सोडण्याची मागणी केली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हिडिओत दिसणारे पाणी चमत्काराने आले नव्हते तर कर्नाटक सरकारने तामिळनाडूतील कावेरी महापुष्करम उत्सवासाठी पाणी सोडले होते.

हेही वाचा- गणपतीची चित्रे छापलेली चप्पल कोणत्या कंपनीने बनवली? तिचे पुढे काय झाले?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा