Press "Enter" to skip to content

रामकृष्ण परमहंस यांच्या काली मठातील पूजा रोखण्यासाठी मुस्लिमांचा जथ्था चालून आला?

पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील काली मठात (Kali Matha) जेथे स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री. रामकृष्ण परमहंस (Ramkrishna Paramhans) पूजा करत असत, त्या ठिकाणची पूजा बंद पाडण्यासाठी मुस्लिमांचा जथ्था चालून आल्याचे दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Advertisement

‘कोलकाता में काली मठ मंदिर में पूजा रोकने के लिए चिल्लाते हुए हजारों की तादाद में मलिच्छ कौम (मुस्लिम), यह वही मठ है जहां श्री रामकृष्ण परमहंस जी द्वारा की जाती थी पूजा । अब ये (तथाकथित शांति प्रेमी) मंदिरों को बंद कराने की मांग कर रहे हैं। यह हमारे अपने देश में क्या हो रहा है? हम कहाँ है? भारत के लोग अपनी लंबी नींद से जल्द ही जागें और देखें कि हमारे आसपास क्या हो रहा है।‘ या अशा कॅप्शनसह व्हायरल होत असणारा व्हिडीओ ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक जॉन चाको यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

हे दावे ट्विटर, फेसबुकवरही व्हायरल होतायेत.

archive

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित बघितला असता व्हिडीओ शूट करणारा व्यक्ती व्हिडीओच्या २.३३ मिनिटाला हे ठिकाण ‘फेनी बारो मस्जिद’ (Feni boro masjid)असल्याचे बंगाली भाषेत सांगताना ऐकू येत आहे.

याचाच आधार घेऊन आम्ही शोधाशोध केली असता १६ ऑक्टोबर २०२१ रोजी याच घटनेचा युट्युबवर अपलोड करण्यात आलेला दुसरा व्हिडीओ बघायला मिळाला.

या व्हिडीओतील आणि व्हायरल व्हिडीओतीन बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आहे.

युट्युब व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सदर घटना बांगलादेशातील फेनी जिल्ह्यातील जय काली मंदिर (Jai Kali Mandir) परिसरातील असल्याचे समजते. ‘ढाका ट्रिब्युन‘ या बांग्लादेशी वृत्तपत्रातील बातमीवरून देखील सदर घटना भारतातील नसल्याचे स्पष्ट झाले.

बांग्लादेशात अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदुंवर मुस्लीम कट्टरपंथीयांकडून अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. नवरात्रीच्या काळात विविध ठिकाणी दुर्गापूजेच्या मंडपांची मुस्लीम जमावाने तोडफोड केली. याचाच निषेध नोंदवण्यासाठी बारो मस्जिद बारो दुर्गा मंदिर परिसरात काही हिंदूंनी निदर्शने केली. यावेळी मुस्लीम व्यक्तीने विटांचे तुकडे फेकून मारले. याचेच पर्यवसान मोठ्या दंग्यात झाले. दंगे रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांसह एकूण ५० जण जखमी झाले आहेत.

वस्तूस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडीओ पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील नसून बांग्लादेशातील फेनी जिल्ह्याच्या बारो मस्जिद भागाचा आहे. कोलकाता येथील रामकृष्ण परमहंस यांच्या काली मठातील पूजा मुस्लीम जमावाने बंद पाडल्याचे व्हायरल दावे फेक आहेत.

हेही वाचा: संघाच्या अमेरिकेत झालेल्या विजयादशमी संचलनास भारतीय माध्यमांनी मुद्दाम प्रसिद्धी दिली नाही?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा