Press "Enter" to skip to content

मुस्लिम समाजाने सामूहिक नमाजसाठी भारतातील रस्त्यावरील ट्रॅफिक जाम केले?

पाकिस्तानी वंशाचे कॅनेडीअन लेखक तारेक फतह (Tarek Fatah) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मुस्लिम समुदायाच्या सामूहिक नमाजचा फोटो शेअर केलाय. फोटो शेअर करताना त्यांनी दावा केलाय की फोटो भारतातील असून मुस्लिम समुदायाने शुक्रवारच्या सामूहिक नमाजसाठी भारतातील रस्त्यावरील ट्रॅफिक जाम केले आहे.

Advertisement

तारेक फतह लिहितात,

“मी तर म्हणेन की ही नमाज नाही तर संख्याबळाच्या जोरावर इतरांना घाबरविण्यासाठीचे शक्तिप्रदर्शन आहे. त्यांना जर नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जायला सांगण्यात आलं, तर तो ‘भेदभाव’ समजला जाईल.” 

अर्काइव्ह

याच फोटोच्या आधारे अशाच प्रकारचे दावे फेसबुकवर देखील केले जाताहेत.

पडताळणी:

व्हायरल फोटो जर व्यवस्थितरित्या पाहिला तर फोटोतील डबल डेकर बसवर ‘BRTC’ लिहिलेलं बघायला मिळतंय. हे ‘BRTC’ म्हणजे ‘बांग्लादेश रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन’

गुगलवर ‘BRTC’ बसचा शोध घेतला असता टीबीएस न्यूज, फायनान्सियल एक्स्प्रेस बांग्लादेश आणि डेली सनच्या वेबसाईटवर सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमधील डबल डेकर बसशी साधर्म्य असणाऱ्या बसचे फोटोज बघायला मिळाले.

रिव्हर्स सर्चमध्ये हाच फोटो आम्हाला ‘अलामी’ या फोटो स्टॉक वेबसाईटवर देखील मिळाला. फोटोच्या कॅप्शनुसार मूळ फोटो बांगलादेशमधील ढाका येथील बिस्व इज्तेमाच्या आयोजना दरम्यानचा आहे. बिश्व इज्तेमा (Bishwa Ijtema) हा मुस्लिमांचा वार्षिक मेळावा आहे.

Source: Alamy

मूळ फोटो शेख मोहोम्मद महदी हसन यांनी घेतलेला असून सध्या व्हायरल होत असलेला फोटो मूळ फोटो क्रॉप करून बनविण्यात आला आहे. शिवाय फोटो सध्याचा नसून साधारणतः 2 वर्षांपूर्वीचा आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो भारतातील नसून बांग्लादेशमधील ‘बिस्व इज्तेमा’ या मुस्लिमांच्या वार्षिक आयोजना दरम्यानचा आहे. शिवाय फोटो दोन वर्षे जुना आहे.

हेही वाचा– ‘हलाल’ म्हणून मुस्लीम स्वयंपाकी मिसळतात अन्नात थुंकी? उच्च न्यायालयात दिली कबुली?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा