Press "Enter" to skip to content

हिंदू महिलेने बसमध्ये छेडछाड करणाऱ्या मौलानाच्या कानाखाली वाजवली?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एक महिला बसमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला मारहाण करताना दिसतेय. सोशल मीडियावर दावा केला जातोय की मागच्या सीटवर बसून छेडछाड करणाऱ्या मौलानाला हिंदू महिलेने चांगलीच अद्दल घडवली.

Advertisement

व्हिडीओ शेअर करताना देशात खरंच हिंदू असहिष्णुता वाढली असून बिचारे मुस्लिम धर्मीय त्यामुळे घाबरले आहेत, असा उपरोधिक टोला देखील लगावला जात आहे.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओतील घटना नेमकी कुठली आहे आणि व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीला सदर महिलेकडून मारहाण का केली जात आहे, हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या.

आम्हाला ‘पाकिस्तान टुडे’च्या वेबसाईटवर २७ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली. या बातमीमध्ये सदर घटनेची सविस्तर माहिती आहे. बातमीनुसार घटना पाकिस्तानातील असून मुल्तानहुन इस्लामाबादला जात असलेल्या बसमध्ये सदर इसमाने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. पीडित महिलेची मैत्रीण ज़हरा नैनने फेसबुकवरून हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Source: Pakistan Today

नैनने सांगितले की सदर इसमाने नंतर पीडित महिलेची माफी देखील मागितली, पण तो आपल्या गैरवर्तनासाठी नाही तर व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट न करण्यासाठी माफी मागत होता. त्याच्याकडून सातत्याने व्हिडीओ डिलीट करायला सांगितलं जात होतं.

‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या वेबसाईटवर देखील या घटनेसंदर्भातील बातमी बघायला मिळाली. या बातमीमध्ये देखील सदर घटना पाकिस्तानातीलच असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी महिलेला धाडसाची दाद देत तिचे कौतुक केले होते, तर काहींनी बसमधील इतरांच्या शांत राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.भारतीय माध्यमांमध्ये ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवर व्हायरल व्हिडीओसह ही पाकिस्तानातील बातमी प्रसिद्ध केली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडिओतील महिला छेडछाड केल्यामुळे सदर इसमाला मारहाण करत असल्याची बाब खरी असली तरी ही घटना भारतातील नसून पाकिस्तानमधील आहे. यातील महिला हिंदू नसून मुस्लिमच आहे, शिवाय ही घटना साधारणतः २ वर्षांपूर्वीची आहे.

हेही वाचा- भारतीय सैन्याच्या ‘मुस्लिम रेजिमेंट’ने पाकिस्तानविरुद्धचे युद्ध लढायला नकार दिला होता?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा